कोरोना वायरसने जगाला आपल्या बाहूपाशात घेतले आहे. बघता बघता डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यातच विषाणू जगभर पसरल्याने त्याच्या विरोधात आता गंभीर लढाई सुरू झालीय. सुरुवातीला सर्वानीच कोविड-19 महामारीला हलक्यात घेतले. 2019 डिसेंबर अखेर या महामारीची माहिती डब्लूएचओकडे आली, त्यावेळी वुहान सिटीत कोरोनाने पाय पसरले होते, त्यामुळे वुहान सिटीच्या सीमापूर्ण बंद करण्यात आल्या. मुळात 30 डिसेंबरला तो समोर आला. डोळ्याचे डॉ. शी वेनलियांग यांनी वुहान मासळी बाजारातून 7 केसेस समोर आल्या आहेत. तो खतरनाक असून आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवा असा मेसेज वुहान यूनिवर्सिटी क्लिनिकल ग्रुपवर शेयर केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तेथे पाबंदी आहे. बाहेरील फेसबुक, ट्विट्टर सारख्या सोशल मिडियावर बंदी असल्याने फक्त चीनच्या सोशल माध्यमाला परवानगी आहे. त्यावरील मजकुरावर देखील सरकारचे बारीक लक्ष असते, त्यातच हा मेसेज लीक झाला. त्यामुळे जगाला कळाले, त्यानंतर मात्र चीन पोलिस 3 जानेवारीला डॉ शी पर्यंत येऊन धडकले आणि त्यांना शांत राहण्याचा दम भरला. 7 जानेवारीला त्यांना ही कोरोनाची लागण झाली, त्यात त्यांचा मृत्यू झाल...