Skip to main content

फक्त लढ म्हणा!

भिंत खचली चुल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पानी थोडे ठेवले''

महापुरानंतर विदारक व काळजाला वेदना देणारी परिस्थिती आहे, त्याच्याशी साम्य दर्शवणाऱ्या
कुसुमाग्रज यांच्या 'फक्त लढ म्हणा'  या कवितेच्या पंक्ती मनात लागलीच तरळल्या. महापुराला आता आठोडा झालाय. पुराचे पानी अद्याप काही ठिकाणी ओसरले नसल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.विशेष करुन पूराने वेढलेल्या ग्रामीण भागात पूरग्रस्तांची उपासमार तसेच रोगराईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भिती आहे. प्रथम कोल्हापूर, सांगलीकरांसमोर रोगराई आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान आहे.प्रशासनासह दानशूर व्यक्ती संघटना मदत करीत आहेत.

"संसार मोडून पडला तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवूणी फक्त लढ म्हणा!"
 महामार्गावरील पानी ओसरू लागल्याने हळूहळू कोल्हापूर शहर पूर्वपदावर येत आहे.दूध, इंधन, गॅस, दैनंदिन गरजेच्या वस्तू पोहचत आहेत.पुरात अनेकांचा संसार वाहून गेलाय त्यामुळे शिधा शिजवण्यासाठीची भांडी आणी धान्य भरडणाऱ्या गिरण्या सुस्थितीत असण्याची शक्यता नाही, त्यामुळे तयार अन्नाची पाकिटे पोहचते करावे लागतील. कोल्हापूर ,सांगलीतील लोक आणी सामाजिक संघटना त्यासाठी कामाला लागल्याय. महाराष्ट्रातील कानाकोप-यातून वैद्यकीय आणी इतर मदतीचा ओघ सुरू आहे. तो जेथे गरज आहे अशा पूररेषेतील ग्रामीण भागात पोहचते करण्याला प्राधान्य दयावे लागेल, संकटातून उभे राहण्यासाठीची धडपड पुरग्रस्त करीत आहेत, त्याच्या जिद्दीला दाद  द्यावी लागेल, तसेच त्यांचे मनोबल उंचावून पायावर उभं करण्यासाठी आपल्या सर्वाना त्यांचा आधार बनवा लागेल.


स्वच्छतेसाठी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी 1 कोटीची तरतूद;  औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
महापुरानंतरचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर आणी काही सामाजिक कार्यकर्त्यानी शिर्डी संस्थाने दिलेल्या 10 कोटी निधीतून काही रक्कम रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेसाठी वापरावी याकरिता शिर्डी संस्थानकडे प्रयत्न चालविले होते ते यशस्वी झाले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने 10 कोटी मुख्यमंत्री निधीला मंजूर करतानाच सांगली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 1 कोटी स्वच्छतेसाठी खर्चाला देण्याचे आपले मागणे मान्य केले आहे, यामध्ये खर्चाबाबत आक्षेप घेणारे पिटिशनर यांनी ही चांगली भूमिका घेतली, ज्येष्ठ पत्रकार माधव ओझा यांनीही साथ दिल्याने. आता सांगली कोल्हापूर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर आजच 1 कोटी जमा होतील. तो फक्त स्वच्छतेवर खर्च करायचा आहे आणि 10 आठवड्यात खर्चाचे अहवाल औरंगाबाद खण्डपीठाला द्यायचे आहेत. एका सकारात्मक कार्याला हाक दिली आणि साईबाबा पावले याचा खूप आनंद आहे. संस्थानचे पदाधिकारी, अधिकारी, न्यायालय आणि पिटिशनर संदीप कुलकर्णी, संजय काळे, माधव ओझा या सर्वांचे आम्ही सांगली, कोल्हापूरकर ऋणी आहोत असे काटकर यांनी सांगितले

दिगंबर मराठे, नाशिक


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...