Skip to main content

संयमी पवार,उद्विग्न पवार!



विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते. भाजपा-सेनेची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. काँग्रेस आघाडीने 252 जागांवरचा तिढा सोडावलाय, दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी 106 जागा व मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्षाला 40 जागा सोडल्या, उर्वरित 36 जागांचा निर्णय ही लवकर होईल, मात्र भाजपा -सेनेचे  जागा वाटप अंतिम झाले नसले तरी मित्र पक्ष धरुन भाजप 162 ते 168 जागांसाठी आग्रही आहे. 2014 निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा होत्या. भाजपा त्यांना 120 ते 125 जागा सोडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे यंदा भाजपा मोठयाभावाची भूमिका निभवण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपा फॉर्मात आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणार नसल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवलेय तसेच भाजपा पुन्हा सत्तेवर येईल असा ठाम विश्वास बोलून दाखविला.
      महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून  मुख्यमंत्र्यांनी  महाराष्ट्र ढवळून काढला आहे. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनीही भाजप मंत्र्यांच्या 90 हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर समोरा समोर चर्चा करावी असे आव्हान मुख्यमंत्र्यांना देत प्रत्यारोपाची राळ उठवून दिली आहे. राष्ट्र्वादीने सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. उदयनराजे यांनी पाठ केल्याने खा.अमोल कोल्हे एकटेच सारथ्य हाती घेत महाराष्ट्र पिंजून काढत आहे. भाजपकडे आयारामांची गर्दी होत आहे. तसा   भाजप सुसंस्कृत पक्ष असल्याचं बोललं जायचं, पक्षातील नेता असो किंवा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता पक्ष देईल ती जबाबदारी ईमाने इतबारे पार पाडत असे, आता भाजपचे अच्छेदिन आहेत. सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याना पक्ष त्याची परतफेड निवडणूक काळात करेल अशी अपेक्षा होती, त्याला डावलून उपऱ्यांना संधी दिली जात असेल तर त्याच्यावर अन्याय केला सारखाच आहे.

आयाराम ठीक पण भाजप निष्ठावंतांचे काय?

लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळवून  भाजपने विरोधकांचे नामोहरण केलं. काँग्रेस तीन आकडी संख्या ही पार करू शकली नाही. त्यानंतर भाजपने राज्यात पण आमचीच सत्ता येईल असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत महाराष्ट्रात महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे.
 यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्र्वादी काँग्रेसचे मोठे मासे भाजपच्या गळाला लागले  आहे. नारायण राणे यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासाठी   निष्ठावंत  मा. खा.दिलीप गांधी यांचे तिकीट कापून सुजॉय विखे यांना उमेदवारी बहाल केली.
   राष्ट्र्वादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, तो राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. वाघ आणि इतर नेत्यांच्या पक्षांतरावर बोलतांना सोडून गेले ते कावळे उरले ते मावळे अशी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांची आठवण पवार यांना व्हावी यातच सर्वकाही आले.उस्मानाबाद राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पद्मसिंह पाटील हे चिरंजीव राणा जगजितसिंह, कोल्हापूरचे धनंजय महाडिक, तसेच उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी राष्ट्रवादीने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेकडे राजेंनी पाठ फिरवली तर माजीमंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, साताऱ्याचे शिवेंद्रसिंह राजे भाजपमध्ये दाखल झालेत. शिवसेनेत  देखील मोठी इनकमिंग सुरू असून राज्यातील बडे प्रस्थ असेलेले छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बार्शीचे आ. दिलीप सोपल यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत. आयारामांचे बंपरपीक भाजप- सेनेमध्ये आलेय, त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयत्या बिळावर जर बाहेरील नागोबांना संधी दिली जात असेल तर निष्ठेला महत्व राहिले नसून निवडणुकी पुरताच वापर करुन घेतला जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच परिस्थिती लक्षात घेऊन आयारामांची चाळणी करण्याचे सुतोवाच केले असून विद्यमान आमदारांना गाळून नव्या चेहऱ्याना संधी दिली जाईल असे स्पष्ट केले पण त्यात सतरंजी उचलणारे किती कार्यकर्ते असतील हे येणाऱ्या काळात दिसेल.स्वतःच्या स्वार्थासाठी, संस्था वाचविणे आणि अनुदान लाटण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांची कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर होत असून भविष्यात त्यामुळे मोठा राजकीय भूकंप पहायला मिळेल अशी  टिका त्यानिमित्त अजित पवार यांनी केलीय.


खा.सुप्रिया सुळे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी 


काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ कसे होतात अशी कोणती वॉशिंग पावडर आहे भाजपकडे असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे कुणाला स्वच्छ करण्याची पावडर नसून विकासाचे डॅशिंग रसायन असल्याचे सांगितले. तसेच आयारामांची चाळणी करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर परत येणाऱ्यांना रांगेत उभे राहावे लागेल असा इशारा सुळे यांनी बंडखोरांना दिलाय. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यात आगामी काळात आणखीनच जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.


           शरद पवारांचा संयम सुटतो तेव्हा.. 

परिस्थिती कशी असो तीला सयंमाने सामोरं जायचे आतापर्यंत अशीच भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राहिली आहे. मग त्यांचे राजकीय विरोधक असो की पत्रकार त्यांनी किती ही टिका टिपणी करो शरद पवार कधी उद्विग्न झाले नाही. आपल्या सयंमित स्वभावाने  त्यांनी विरोधकांची व टिकाकारांची मनं ही जिंकली. इतर आरोप करणाऱ्यांना सर्वाना त्यांनी मोठया मनाने माफ करण्याची प्रगल्भता दाखवली. त्यांची संयमी राजकारणी अशी प्रतिमा देखील सर्वश्रुत आहे. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतील दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करत आहे. उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांचे नातेवाईक पदमसिंह पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. शिर्डीत झालेल्या पत्रपरिषदेत एका पत्रकाराने तुमचे नातेवाईक देखील भाजपमध्ये जात आहे असा सवाल पवार यांना केला होता. त्यावर पवार उद्धिग्न झाले, नातेवाइकांचा काय संबंध आहे, नेते येतात जातात. तुम्ही माफी मागा असा पवित्रा घेत पत्रकाराला बाहेर जाण्यास सांगितले. पवारांची ही उद्विग्नता स्वाभाविक आहे, डॉ पदमसिंह पाटील राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवार यांच्या सोबत आहे. आता त्यांच्यासह अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत त्यामुळे अडचणीच्या काळात एकेक करुन जात असल्याने पवार हे काहिसे चिंतीत दिसत असल्याचे या घटनेवरुन दिसून आले.


मरगळलेली काँग्रेस 

राज्यभरात राजकीय पक्षांच्या यात्रा निघाल्या आहेत. भाजपने महाजनादेश यात्रा काढून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर भाजपच्या गडावर राष्ट्रवादीची नजर असून राष्ट्र्वादीने शिवस्वराज्य यात्रेद्वारे विदर्भ पिंजून काढला आहे. ,शिवसेनेही जनआशीर्वाद यात्रा काढून निवडणुकीत आघाडी मिळवण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली आहे. शिवसेनेचे युवराज स्वतः फिरत आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रा निघाल्या आहेत. भाजपने महाजनादेश यात्रा काढून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. तर भाजपच्या गडावर राष्ट्रवादीची नजर असून राष्ट्र्वादीने शिवस्वराज्य यात्रेद्वारे विदर्भ पिंजून काढत आहे. ,शिवसेनेही जनआशीर्वाद यात्रा काढून निवडणुकीत आघाडी मिळवण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली आहे. शिवसेनेचे युवराज स्वतः फिरत आहेत. दुसरीकडे काँग्रेस लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच नारायण राणे यांच्यानंतर पक्षाला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाती कमळ धरले, त्यापाठोपाठ आ. निर्मला गावित यांनी ही शिवबंधन बांधले, गावित आणि गांधी घराण्याचा तसा जूना घरोबा  निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे या ठिकाणाहून तब्बल 9 वेळा खासदार झाले. सोनिया गांधी लोकसभा निवडणुकीतील  पहिली प्रचारसभा नंदूरबार येथेच घेत असत, त्यानंतर ही उरले सुरले अनेक नेते कार्यकर्ते भाजपच्या गोटात गेले , उशीरा का होईना मरगळलेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी विदर्भातील अमरावती येथून भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या विरोधात महापर्दाफाश यात्रा काढत पक्षात नवचैतन्य फुकण्याचा प्रयत्न केला. त्याला किती यश येते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.


Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...