माधव ओझा
शिर्डी: इतिहास नसलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याच्या घटनेनं शिर्डीकर हादरले. शिर्डीलगत असलेल्या निमगावमध्ये निवासी संस्थान कर्मचाऱ्याने आपल्या आईला 23 तारखेला नेहमीच्या आरोग्य तपासणीकरिता साईबाबा हॉस्पिटल येथे आणले. त्यादिवशी लक्षणे नसल्याने डॉक्टरांनी नेहमीचा औषध उपचार सुरू केला.त्यानूसार पुढील तीन दिवसानी सदर महिलेचा सी टी स्कँन कोरोना सदृश्य जाणवल्याने त्या महिलेस अहमदनगर येथे पाठवले. दुसरे दिवशी सदर महिला ही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आल्यावर शिर्डी परिसर हादरला.
23 ते 26 मे या तीन दिवसात साईबाबा हॉस्पिटलचे सुमारे 12 कर्मचारी या महिलेच्या थेट संपर्कात आले होते.त्या सर्वासह परिवारातील सदस्य असे एकुण 29 लोकाना अहमदनगर येथे कोरोना तपासणी करिता पाठविले.त्यापैकी पाच जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आल्याने शिर्डीकर चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. तर निमगाव पुढिल 14 दिवसाकरीता बंद करण्यात आल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यानी दिली.
शिर्डीच्याच हद्दीत पहिला कोरोना रुग्ण आढळला व त्यामूळे अन्य पाच बाधित झाले आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही शतक ओलांडून पुढे गेली आहे. दरम्यान काल दिवस भरात सुमारे साठ संशयितांची कोरोना तपासणी केली असता त्यातील 51 लोकांचे नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.
