Skip to main content

कोविड-१९: मुलांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी जागरुक रहा: बाल मानसशास्त्रज्ञ तरुणा समनोत्रा

डब्ल्यूएचओच्या युरोपीय विभागातर्फे १९ मे २०२० रोजी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. २०१४ ते २०१८ कालावधीतील हा अहवाल  ११ ते १५ वर्षीय मुलांच्या मानसिक आरोग्यावर आधारीत होता. साहजिकच तो महामारीच्या आधीच्या कार्यकाळातील अहवाल आहे. मात्र या अहवालातील अभ्यास ध्यानात ठेवून आपल्याला भारतातील मुलांसाठी कोविड-19 च्या काळात काम करावे लागणार आहे. या महामारीचा परिणाम हा शाळांमधील मुले आणि किशोर-किशोरींच्या मानसिक स्वास्थ्यावर होण्याची शक्यता आहे. 
Covid-19-corona-virus
आपल्यातील बहुतेक लोकांना माहित आहे की मोठ्या शहरांमध्ये शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. विद्यार्थी गॅजेट्सच्या सहाय्याने शाळांशी कनेक्ट होत आहे, त्यांचा जास्त वेळ हा 'गॅजेट्स हाताळण्यात जात आहे. या आभासी जगाने 'वास्तविक जग' बदलले आहे. विद्यार्थ्यांची दिनचर्या अचानक बदलली आहे. त्यांच्यात बदल घडवून आले आहे. त्यांच्यात विचार, चिंता आणि अवसाद दिसून येत आहे. काही गोष्टी मला चिंतित करतात, आम्ही पहिल्यांदा चर्चा केलेल्या लोकांपेक्षा ही परिस्थिती भिन्न आहे.  

माझ्यामते कोविड-१९ या कालावधीनंतरच्या शालेय जीवनात काही नवीन अडचणींना मुलांना सामोरे जावे लागेल म्हणजेच त्यांना  'वास्तविकतेशी समायोजन करणे किंवा जुळून घेण्यात अडचणी येतील. त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल, 'आभासी जगातून' त्यांना 'वास्तविक जगात आणण्याच्या प्रक्रिये दरम्यान त्यांच्यात चिंता वाढू शकते. त्यासाठी आपल्या सर्वांना त्याच्याशी कनेक्ट राहावे लागेल. सध्याचे ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी एका चहाच्या कपा सारखे नाही, त्यामुळे सर्वांना आपण एक सारखे गृहीत धरू शकत नाही, त्याची आवश्यकता ही नाही. एकदा शाळा सुरू झाली की पुन्हा त्यांच्यावर शिक्षणात चांगले प्रदर्शन दाखवण्याचा दबाव असेल, सुरुवातीला त्यांच्यात चिंता निर्माण होईल परंतु जीवनांत पुढे जाण्यास आणि जास्त प्रगती आणि ज्ञान प्राप्त करण्यास मदत होईल हे ही तितकेच खरे!

सुरुवातीच्या दिवसांत विद्यार्थ्यामध्ये आपल्या गॅझेट्स मित्राशी दुरावल्याची भावना निर्माण होऊन तो चिंतीत होईल, त्यावेळेस त्याला घरातील जवळच्यांनी मित्रत्वाच्या नात्याने स्वतंत्रपणे त्याच्याशी संवाद स्थापित करायचा आहे.  माझा विश्वास आहे की पालकांसोबत शाळेतील शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची आहे.  त्यासाठी आपल्याला शिक्षकांना प्रथम विश्वासात घेऊन परिस्थिती साधारण बनवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  मी शिक्षकांना अशा उपाययोजना बनविण्यास सुचवते ज्यामुळे युवांना त्यांच्या मनाची कवाडे उघडून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देता येईल.  सुरुवातीच्या दिवसांत शाळेत हलके फुलके आणि मौज-मस्ती सारखे वातावरण निर्माण करावे. आपल्याला सिलेबस पूर्ण करण्याची चिंता राहील परंतु त्याऐवजी आपण विद्यार्थ्यांची चिंता करायला हवी, आपण हे विसरायल नको की ते देशाचे भविष्य आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे देशाच्या स्वास्थ्याशी निगडीत आहे, आपण सर्वजण मिळून त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी झटूया आणि उज्ज्वल भारत घडवूया !

तरुणा समनोत्रा
बाल मानसशास्त्रज्ञ,
उपचारात्मक प्रशिक्षक
मो-98501 86863

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...