!! 🌹🌹 "शाळा" 🌹🌹 !!
************************
नेसायचा रामु पट्टयाची चड्डी !
चड्डीला सारखा कमरेवर वढी !!
चड्डीला असती पिळदार नाडी !
हुतुतु खेळतांना लावतसे काडी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
खेळ खेळुन रामु दमतसे गडी !
हळुच भाकरीचं पेंडकच सोडी !!
मित्रांना सांगे चला रे जोडी !
वाटून खाऊ कैरीच्या फोडी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याणा !!
रामुची गंमत असे खूप भारी !
जोराचा पाऊस येता जातसे घरी !!
श्रावणात येती पावसाच्या सरी !
बारदान घोंगडी घेई अंगावरी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुच्या शाळेची तऱ्हाच न्यारी !
पनाळी कौलांची छत दिसे भारी !!
शाळेची घंटा टांगे अढयावरी !
सुटती भरती शाळा टणटण करी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुला पाहून चिव चिव करी !
पिलांची किलबिल असे ती भारी !
चिमणीचा खोपा दिसे भिंती वरी !
खोप्यात दिसती पिलं तर भारी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुला येत नसे कुठलेच पाढे !
पाहत बसे वरती शाळेचे आढे !!
मास्तर शिकवती बेचेच पाढे !
चिऊताई मध्येच आवाज काढे !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुची मजा खूप असे न्यारी !
मित्रांचे टोळके करी मारामारी !!
सकाळ होता पोरं जमतसे सारी !
लिंगोरचा खेळ खेळतसे भारी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
शाळेत असती खोडकर पोरं !
मास्तर म्हणे नका बसु म्होरं !!
शाळे पुढे असती पिंपळ पारं !
सूर पारंब्या खेळे सारीच पोरं !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
खोडकर रामू दिसतसे भारी !
हळूच बोटाने टिचक्याच मारी !!
मास्तर जाता पाटलाच्या घरी !
शाळेत सारी पोरं गोंधळ करी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कवी:- जी.पी.खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
************************
चड्डीला सारखा कमरेवर वढी !!
चड्डीला असती पिळदार नाडी !
हुतुतु खेळतांना लावतसे काडी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
खेळ खेळुन रामु दमतसे गडी !
हळुच भाकरीचं पेंडकच सोडी !!
मित्रांना सांगे चला रे जोडी !
वाटून खाऊ कैरीच्या फोडी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याणा !!
रामुची गंमत असे खूप भारी !
जोराचा पाऊस येता जातसे घरी !!
श्रावणात येती पावसाच्या सरी !
बारदान घोंगडी घेई अंगावरी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुच्या शाळेची तऱ्हाच न्यारी !
पनाळी कौलांची छत दिसे भारी !!
शाळेची घंटा टांगे अढयावरी !
सुटती भरती शाळा टणटण करी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुला पाहून चिव चिव करी !
पिलांची किलबिल असे ती भारी !
चिमणीचा खोपा दिसे भिंती वरी !
खोप्यात दिसती पिलं तर भारी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुला येत नसे कुठलेच पाढे !
पाहत बसे वरती शाळेचे आढे !!
मास्तर शिकवती बेचेच पाढे !
चिऊताई मध्येच आवाज काढे !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
रामुची मजा खूप असे न्यारी !
मित्रांचे टोळके करी मारामारी !!
सकाळ होता पोरं जमतसे सारी !
लिंगोरचा खेळ खेळतसे भारी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
शाळेत असती खोडकर पोरं !
मास्तर म्हणे नका बसु म्होरं !!
शाळे पुढे असती पिंपळ पारं !
सूर पारंब्या खेळे सारीच पोरं !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
खोडकर रामू दिसतसे भारी !
हळूच बोटाने टिचक्याच मारी !!
मास्तर जाता पाटलाच्या घरी !
शाळेत सारी पोरं गोंधळ करी !!
चिऊताई म्हणे चिव चिव म्हणा !
कावळेराव सांगे सुट्टीचं घ्याना !!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कवी:- जी.पी.खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
