त्र्यंबकेश्वर/ प्रतिनिधी: राज्यात ३४ लाख गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ झाला असून श्रमिक कामगारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध प्रकारची व्यवस्था करण्यासाठी ५५ कोटींची मदत देण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी दिली. नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा, तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ आढावा बैठक नुकतीच प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
![]() |
| फोटो:रायुकाँ, नाशिक जिल्हा |
या बैठकीमध्ये मोठ्या संख्येने तालुका अध्यक्षांनी सहभाग घेतला होता. यावेळी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये covid-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेण्यात आला. तसेच covid-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजना व जनतेच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सखोल माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रदेश कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी आपल्या प्रस्तावनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, आ.दिलीप बनकर, आ.माणिकराव कोकाटे, आ.हिरामण खोतकर, आ.नितीन पवार, आ.सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समाजघटकांना देण्यात आलेल्या शासकीय मदतीविषयी सविस्तर माहिती दिली. आ. रोहित दादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती ॲग्रोच्या माध्यमातून राज्यभरात सॅनिटायझर पोचवण्यात आले, नाशिक जिल्ह्यात देखील सॅनिटायझर पुरवठा करण्यात आला. covid-19च्या परिस्थितीशी सामना करत असताना माननीय प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांचे ही मार्गदर्शन लाभले असल्याचे कडलग यांनी सांगितले.
झूम अॅप च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी डॉक्टर सेलचे अध्यक्ष योगेश गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भाऊ अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण भुसारे, प्रफुल पवार, त्रंबकेश्वर तालुकाध्यक्ष कैलास मोरे, नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, निफाड तालुका कार्याध्यक्ष भूषण शिंदे, निफाड तालुका उपाध्यक्ष सचिन पवार, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, दिंडोरी विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे, दिंडोरी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तोसिफ मनियार, नांदगाव तालुकाध्यक्ष बबलू पाटील, देवळा तालुकाध्यक्षांचे प्रतिनिधी राजेश आहेर, पेठ तालुकाध्यक्ष गवळ, येवला तालुका प्रतिनिधी मोसिन तंबोली, मालेगाव तालुकाध्यक्ष अरुण अहिरे, बागलान तालुका अध्यक्ष सम्राट काकड, जयेश अहिरे, जावेद शेख, अमोल पाटील, धनंजय बोरसे, रवी बसते, कल्पेश आहेर, सागर दरेकर आदींसह सर्व तालुक्याचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे
यांनी सर्व तालुका अध्यक्षांच्या सूचना व त्यांनी केलेले मदत कार्य याबद्दलची माहिती वरिष्ठ पातळीवर कळविली जाणार असल्याची माहिती दिली. बैठकीला संबोधित करण्याआधी covid-19 मुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली, तसेच covid-19 योद्धा हा सर्वात अत्यावश्यक सुविधा देणारा घटक असून त्यांचे आभार मानण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात covid-19 प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनस्तरावरुन उपाययोजना माहिती करण्यात आल्याची माहिती रविकांत वरपे यांनी दिली, त्यांनी सांगितले की, जवळपास 34 लाख शिवभोजन थालीचे वाटप समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाले आहे. त्याचबरोबर 55 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून परराज्यातील मजुरांच्या देखभालीवरती खर्च झाला, त्यात त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था आणि बस, रेल्वे खर्चाचा समावेश असल्याचे सांगितले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी उत्तम नियोजन करून समाज घटकातील कोणताही व्यक्ती अन्नावाचून राहणार नाही याची दक्षता घेेेेेेतली. त्यासोबत पिवळा व नारंगी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य पुरविण्याकरता अतिशय नियोजनात्मक काम सुरू असल्याची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकार अतिशय पारदर्शक रित्या covid-19 विरोधात लढा देत असून इतर राज्यांसारखी आकड्यांची लपवाछपवी न करता प्रामाणिकपणे व योग्य रीतीचे काम करत असल्याचे सांगितल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांमुळे उपलब्ध झालेल्या रोजगार संधीमध्ये स्थानिक युवकांना संधी मिळण्याकरिता तालुकास्तरावरुन गरजू होतकरू युवकांची माहिती गोळा करुन त्या युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रतिनिधींनी आपल्या वरिष्ठ पातळीवरची मदत घेऊन राज्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध कसा होईल याबद्दल काम करण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना केल्या. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यापुढे कोणत्याही प्रकारची समस्या कोणत्याही प्रकारचे सहकार्य त्यांना पाहिजे असल्यास जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी संपर्क करून समस्या दूर कराव्यात असे सांगितले. महाविकास आघाडीने covid-19 विरोधात कंबर कसून संघर्ष करत असताना भारतीय जनता पार्टी राज्यांमध्ये राजकारण करत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील covid-19 परिस्थितीची माहिती व त्यांनी केलेली मदत कार्याची माहिती दिली. त्रंबकेश्वर तालुकाध्यक्ष कैलास मोरे यांनी त्यांनी केलेल्या सर्वसामान्य गरीब घटकातील लोकांच्या मदतीबाबत माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीला बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनात आणून देऊन त्यावरील उपाय म्हणून केंद्र शासनाच्या दर नियंत्रण कायद्याचे अंमलबजावणी करून वाढत चाललेल्या दरांना नियंत्रणात आणावे अशी मागणी केली. जिल्हा उपाध्यक्ष श्यामभाऊ हिरे यांनी महाविकास आघाडी सरकार करत असलेल्या योग्य कामाची माहिती देत असताना विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चुकीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे अतिशय निंदनीय प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले प्रशासनाच्या माध्यमातून अशी चुकिची माहिती पसरू नये म्हणून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे माध्यमातून जिल्ह्यात होत असलेल्या मदत कार्याची माहिती दिली,त्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या अत्यावशक सेवा पुरवणाऱ्या घटकांपर्यंत राष्ट्रवादी वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेले सेफ्टी किट पोचवण्यात मोठी मदत झाल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांनी त्यांच्या माध्यमातून गरजू घटकांपर्यंत अन्नधान्याची व्यवस्था पोहोचवण्याची माहिती दिली. दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिंडोरी तालुका कोरणा मुक्त अभियानाची माहिती दिली, लवकरच दिंडोरी तालुका करोनामुक्त करण्याकरिता कंबर कसली असल्याचे सांगितले. दिंडोरी तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तोसिफ मनियार यांनी काही समाजकंटकांनी covid-19 मुस्लिम समाजामुळे पसरत असल्याच्या अफवा उडवून मुस्लिम समाजाविरुद्ध इतर समाज घटकांना द्वेषाची भावना निर्माण करण्याचे काम करत असल्याचे सांगितले व अशा समाजकंटकांना कठोर शासन करून समाजात एकोपा राहावा याकरिता महाविकास आघाडीच्या सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून करण्याची विनंती केली.मालेगाव तालुकाध्यक्ष अरुण अहिरे यांनी मालेगाव मधील परिस्थितीची माहिती दिली व राज्यात हॉटस्पॉटमुळे बंद केलेल्या मालेगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासन काम करत असून या मदतीमध्ये राष्ट्रवादी युवक कांग्रेस पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असल्याची माहिती त्यांनी दिले.
बागलाण तालुकाध्यक्ष सम्राट काकड यांनी माजी आमदार दीपिकाताई चव्हाण यांच्या माध्यमातून होत असलेल्या मदतची माहिती दिली. निफाड तालुका कार्याध्यक्ष भूषण शिंदे यांनी माननीय आमदार दिलीपकाका बनकर यांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य गरजू घटकांपर्यंत पोहचते होत असल्याची माहिती दिली. पुढील काळामध्ये निफाड तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी निफाड सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. नांदगाव तालुकाध्यक्ष बबलू पाटील यांनी परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परत गेल्यामुळे उपलब्ध झालेल्या रोजगार संधीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची विनंती केली. उपलब्ध असलेल्या आस्थापनाला संघटनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. येवला तालुक्यातील प्रतिनिधी मोहसिन तंबोली यांनी येवला तालुक्यामध्ये ना. भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून व त्यांनी स्थापन केलेल्या मदतकार्य ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. अशा प्रकारे सर्व तालुकाध्यक्ष आपापल्या तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिलीवदिली तसेच उपाययोजना सुचवल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न शासनस्तरावरुन मार्ग काढण्याची विनंती सर्व तालुकाध्यक्षांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे आणि सर्व पदाधिाऱ्यांचे आभार मानले.



