Skip to main content

एसटीतील 27 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करा: एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

मुंबई|एसटी महामंडळाच्या एकूण अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च डिझेल व वेतनावर होत असून एकूण 1लाख 2000 कर्मचाऱ्यांपैकी जेष्ठ 27 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी तसेच कंत्राटी पद्धतीवरील 1600 कर्मचाऱ्यांच्या जागी एसटी मधील कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी त्यामुळे खर्चात मोठी बचत होऊन उध्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल, भविष्यात वेतनवाढ सुद्धा करता येईल अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना.अनिल परब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून दिले आहे. 
St-vouluntariy
लॉकडाऊन काळात एसटी महामंडळाचे दररोज 22 कोटी रुपये इतके उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच पूर्ण वेतन मिळत नाही.गेले तीन महिने वेतन उशिरा व कमी मिळत असल्याने व अगोदरच वेतन तुटपुंजे असल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे.भाड्याच्या घरात राहणाऱ्या तसेच शाळा कॉलेजमध्यें शिक्षणासाठी मूले असलेल्या कर्मचाऱ्यांना तर भयंकर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहें.त्यामुळे डीजल तसेच वेतनावर  होणाऱ्या खर्चावर तत्काळ मर्यादा आणावी लागणार आहे. डिझेलवरील केंद्र व राज्य सरकारचा कर माफ केला पाहिजे या साठी महामंडळा कडून प्रयत्न व्हायला हवेत.

याशिवाय 27 हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांना फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणली व ते स्वेच्छेने निवृत्त झाले तर वेतन खर्चात मोठी बचत होऊ शकेल.तसेच कंत्राटी पद्धतीवरील अंदाजे 1600 कर्मचाऱ्यांच्या जागेवर एसटी मधील अतिरिक्त कर्मचारी वर्ग वापरला पाहिजे.त्यामुळे सुद्धा मोठी बचत होणार आहे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. एसटीमध्ये साधारण एक लाख दोन हजार कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यांच्या वेतनासाठी भविष्य निर्वाह निधीतला हिस्सा तसेच इतर रक्कम धरून एकूण 270 ते 280 कोटी महिन्याचा खर्च होतो. त्यापैकी 27 हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण रुपये शंभर कोटी खर्च होतात. तसेच राहिलेल्या साधारण 75 हजार कर्मचाऱ्यांवर साधारण 170 ते 180 कोटी खर्च होतो, याचाच अर्थ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मर्यादा आणाव्या लागतील. 

त्यांना चांगली फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणावी व असे कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त झाले तर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल व भविष्यात चांगली वेतनवाढ सुद्धा करता येईल.या शिवाय यापुढे अजून काही महिने वाहतूक सुरळीत होणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे काहीं प्रमाणात अतिरिक्त कर्मचारी वर्ग होणार असून त्यांचा वापर एसटीमध्ये अंदाजे सोळाशे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यांच्यावर साधारण चार कोटींचा खर्च होत आहे, तो खर्च वाचविण्यासाठी एसटीमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम द्यावे, त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम मिळेल आणि एसटीचे महिन्याला अंदाजे चार कोटी वाचतील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहें. यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे कोषाध्यक्ष संतोष गायकवाड हे हजर होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...