Skip to main content

शेतकऱ्यांसाठी बिडकीन फूडपार्क उत्तम पर्याय

औरंगाबाद|बिडकीन येथे 500 एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्यापुर्वी केली. त्यानुसार ऑरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष जागा विकसित करण्यास सुरूवात केली, ही समाधानकारक बाब असून शेतकऱ्यांसाठी हा फुड पार्क उत्तम पर्याय ठरेल, त्यादृष्टीने गतीमानतेने येथील कामे उत्कृष्टरित्या पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिल्या.
Bidkin-foodpark-aurangabad
जिल्हाधिकारी कार्यालयात बिडकीन येथील फूडपार्क कामाबाबत आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे राज्याचे उद्योग सचिव वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण, एमआयडीसीचे  सहमुख्य  कार्यकारी अधिकारी, तथा ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, एमआयडीसीचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी तथा ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच इतर अधिकारी यांची उपस्थित होते. 

उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत ज्याप्रमाणे देशभरात एक आदर्श उदाहरण ठरली आहे. त्याचप्रमाणे बिडकीन फुडपार्कची उभारणी उत्कृष्टरित्या करावी. औरंगाबाद हा कृषी प्रधान जिल्हा आहे. येथील शेतकरी कापूस, मका, सोयाबिन, डाळिंब, शेवगा यासह विविध फळपीके, भाज्या यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. यासोबतच याठिकाणी तुती लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. मात्र त्यातील रेशीम कोषातून धागा तयार करण्यासाठी कोष बँगलोर येथे पाठवावे लागतात. या सर्व पार्श्वभुमिवर बिडकीन फुडपार्कमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, बचतगटांना, नवउद्योजकांना अन्नधान्य प्रकियांचे उद्योग करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. जेणेकरून शेतीव्दारे नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घेता येईल. त्यांचा शेतीमधील उत्साह वाढेल. पर्यायाने शेती टिकून राहण्यासाठी, शेतकरी सुरक्षित होण्यासाठी या सर्वांचा फायदा होईल.या व्यापक उद्देशातून फूडपार्कचे महत्व लक्षात घेऊन फूडपार्कची उत्तम उभारणी करावी, अशा सूचना श्री. देसाई यांनी केल्या. 

एकूण 517 एकर जागेवर हा फूड पार्क उभारला जाणार असून यापैकी 60 एकर जागा ही विकसित आहे तर 457 एकर जागा अविकसित आहे. या संदर्भातील आराखडा, प्लॅनिंग उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सादर करण्यात आले. यावेळी श्री. देसाई यांनी दिलेल्या सूचनेनूसार लवकरच विकास कामाला सुरूवात होईल व जानेवारी अखेरीस हा फूड पार्क लोकार्पण करण्यात येईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण यांनी सांगितले. फूडपार्कच्या आराखड्याबाबत ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी माहिती दिली. श्री. काटकर यांनी फूडपार्कमध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबद्दल माहिती दिली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...