20 मार्चचा दिवस सराफ बाजार बंद! व्यवसाय पूर्णपणे ठप्प, ऐन लग्नसराईचा काळ आणि 100 कोटी उलाढाल असणारी बाजारपेठ पूर्ण पणे बंद, पण सोने भाववाढ सुरूच होती. दि. 22 मे रोजी अचानक बातमी आली, ग्रीन झोनमधील दुकानं उघडणार नाही, कारागिरांनी ही घरी जाणाचा निश्चय केलेला, एक एक दिवस सरत होता, परिस्थिती बिकट होती तरी काही दिवस ते थांबले अपेक्षा हीच की नाही आता सर्व सुरळीत होईल
जून महिन्यात काही लग्नतिथी आहे. त्यामुळे काम सुरू होणार अशी खात्री सर्वानाच होती, आणि झालं ही तसेच, जसं लॉकडाऊन उघडलं तसे काम सुरू झाले, या लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान आता अतिरिक्त काम करुन भरुन काढू असा विचार होता. त्यासाठी सर्व विश्वासाने जोमानं कामाला लागले, पण बाजारपेठेत बिनकामाची गर्दीच अधिक होती, ही गर्दी काही कमी होत नव्हती, छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाजारपेठेत येणाऱ्यांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे.
जागतिक स्तरावरील अस्थिर परिस्थितीमुळे आधीच बाजाराची स्थिती नाजूक आहे. असे असले तरी यावर्षी पर्यटनासाठी आणि लग्नासाठी खर्च न केलेला पैसा यात निश्चितच फायदेशीर गुंतवणूक होईल असा विश्वास होता, त्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे दिसले, आजही खात्रीशीर गुंतवणूक म्हणून सोन्याला पहिली पसंती आहे, हे लक्षात आल्याने खरेदीसाठी हळूहळू नागरीकांचे पाय बाजाराकडे वळू लागले.
जशी बाजारपेठ खुली झाली गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली काळ संकटाचा आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढली, या पार्श्वभूमीवर परत 20 जूनला बाजारबंद होते, शहरात रुग्ण संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसेना, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहक बाजाराकडे फिरकला नाही, बंदला प्रतिसाद दिसला, वातावरण बघून कारागीर आणि परराज्यातील कामगार ही पुन्हा काम सोडून घरी जाण्याच्या तयारीला लागले होते, यासर्व परिस्थितीचा कुठेतरी उत्पादन निर्मितीवर थेट परिणाम होईल अशी चिंता व्यापारी वर्गात होतीच. यामुळे मागणी आणि पुरवठा याचे गणित कोलमडण्याची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत आहे.
27 जूनला पुन्हा बाजार उघडले, आता सोन्याने नवा उच्चांक गाठला असून सोने प्रति 10 ग्रॅमला भाव 50 हजारापर्यंत पोहचला आहे, असे असले तरी सर्वांमध्ये काम करण्याची दृढ इच्छा दिसत आहे, नियम पाळून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे, पण दुसरीकडे कोरोनाचे संकट ही वाढत आहे. महामारी सध्या तरी आटोक्यात येतांना दिसत नसली तरी अशा ही परिस्थितीत सावधपणे मार्गक्रमण करत राहणे हाच पर्याय आहे, जगण्याचा तो आता अविज्य भाग बनला आहे. या महामारीवर अद्याप औषध नाही, सरकारकडे साधन सामग्रीची हवी तितकी व्यवस्था नाही, दवाखाने फुल्ल झाली, त्यामुळे आपण आपली काळजी घेणे आणि सांगितलेल्या सूचना पाळणे तेच आता महत्वाचे आहे.
कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या वार्ता ऐकल्या की चिंता वाटते, सध्या बाजार उघडलाय पण भीतीची छाया आहेच, पण अर्थचक्र सुरू राहायला हवे, त्यामुळे सराफी व्यवसायाचा एक घटक म्हणून अर्थचक्राला गती मिळावी यासाठी बाजारपेठ सुरू ठेवणे सध्याची गरज बनली आहे. आजच्या संकटाच्या काळात एक सुजाण नागरिक म्हणून आपल्यासह परिवाराला सुरक्षित ठेवणे तितकेच महत्वाचे आहे, बाजारात अनावश्यक गर्दी करू नये, घरीच थांबावे, हा प्रश्न लवकर सुटेल असे तूर्तास तरी वाटत नसून काळजी घेणे हेच सध्या आपल्या हाती आहे.
मेहुल थोरात
संस्थापक सदस्य
कॅट-ऑल इंडिया ज्वेलरी अँड गोल्डस्मित फेडरेशन
उपाध्यक्ष,
दि नासिक सराफ असोसिएशन

