शैलेश पुरोहित
इगतपुरी| राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हॉटेल उघडण्यावर शासनाची बंदी असून ही बंदी झुंगारुन इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेल सर्रासपणे उघडे ठेवल्याने पोलिसांनी आज छापा टाकत हॉटेलला कुलूप ठोकले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी भा.द.वि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र आणि राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली होती, असे असतांना शासकीय आदेशाची पायमल्ली करुन इगतपुरी येथील रेन फॉरेस्टच्या हॉटेल प्रशासनाने आपले हॉटेल हे सर्रासपणे सुरू ठेवले आहे,
इगतपुरी पोलिसाना हॉटेल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यामाहितीच्या आधारे इगतपुरी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता येथे बरेच पर्यटक वास्तव्यास असल्याचे आढळले. पोलिसांनी येथे आलेल्या वाहनाची कडक तपासणी करुन वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली तसेच या हॉटेलवर कलम १८८ नुसार कारवाई केली.