नाशिक| केंद्र सरकारने ज्वेलर्ससाठी दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य केले आहे, त्यामुळे हॉलमार्क करण्यासाठी कॅट तर्फे मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली, त्याप्रमाणे केंद्राने अंतिम तारीख सप्टेंबर ते जून २०२१ पर्यंत वाढविली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि देशातील ज्वेलरी व्यापारयांची सर्वात मोठी संस्था, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा देशाच्या ज्वेलर्स व्यापाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे.
![]() |
| फोटो:फाईल |
CAIT & AIJGF संघटनानी काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांना निवेदन पाठविले होते. कोरोनामुळे चालू वर्षात बंद पडलेल्या व्यापाराचे कारण सांगून हॉलमार्कसाठी आवश्यक असलेली मुदत वाढवावी अशी मागणी केली. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी स्वत: केंद्रियमंत्री गोयल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती केली जी मान्य करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला.
देशभरात ३ लाखाहून अधिक दागिने व्यापारी आहेत, त्यापैकी सुमारे ३० हजार बड्या व्यापाऱ्याकडे केवळ हॉलमार्कची सुविधा आहे. याविषयी आयएनजेजेएफचे राष्ट्रीय संयोजक पंकज अरोरा म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सुमारे २.७५ लाख लहान ज्वेलर्स व्यापाऱ्याना, परंतु त्यांच्याशी संबंधित सुमारे २.७५ लाख लहान ज्वेलर्स व्यापार्यांना ,आणि त्याच कारागीर ना पण मोठा दिलासा मिळणार आहे
आधीच करोना व तसेच सोने चांदी भाव वाढमुळे होणाऱ्या अस्तिर परिस्थितीत कॅट आणि 'एआयजेजीएफ'ही संस्था व्यापारी हितासाठी कायम अग्रस्थानी असून पुढाकार घेते व कार्य तडीस नेत आहे. त्याबरोबर Cait -Aijgf तर्फ़े १० हजार राखी भारतीय सेनेसाठी बनविण्यात आल्या असून श्री.राजनाथ सिंह यांच्या कडे सुपूर्त केल्याय, असे 'एआयजेजीएफ'चे संस्थापक सदस्य, महाराष्ट्र माध्यम प्रमुख, नाशिक सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.
