नाशिक| सरकारवाडा पोलीस स्टेशन अंकित नुतनीकरण केलेल्या सराफ बाजार पोलिस चौकीचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते आज सोशल अंतर पाळून पार पडला.
![]() |
| फोटो: नाशिक प्रेस ग्रुप |
यावेळी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त अमोल तांबे, परिमंडळ 2 पोलिस उपायुक्त विजय खरात, मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंंग सुर्यवंशी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक साजन सोनवणे,भद्रकाली पोलीस ठाणे, पोनि इनामदार साहेब ट्राफिक युनिट 2 इतर अधिकारी व कर्मचारी तसेच पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक सौ आरती आळे या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.
तसेच सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नगरसेविका वैशाली भोसले, किराणा मर्चंट असोसिएशन'चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, शिल्पकार प्रसन्ना तांबट, श्याम तांबोळी, सचिन साकुरकर, कृष्णा नागरे, पवन महालकर आदी शुभेच्छा देण्याकरता हजर होते.
यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी चौकीचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन जनतेची सेवा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
विनयनगर येथे पोलीस चौकीचे उदघाटन
मुबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दतील विनयनगर पोलीस चौकीचे उदघाटन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि २८) करण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपायुक्त अमोल तांबे उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त मगलसींग सूर्यवंशी, मुबई नाका पोस्टेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, भद्रकाली पोस्टेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले.




