नाशिक| भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला जागे करून भाविकांसाठी देवस्थाने खुली करण्यासाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी निवासीनी भगवती गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळे, देवालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने परीपत्रक काढले असताना देखील, सरकारच्या अजब निर्णयाने राज्यातील देवालये सर्वांसाठी खुले झाले मात्र मंदिरे बंद ठेवून भाविकांची कुचंबणा केली तसेच तिर्थक्षेत्र परिसरातील बहुसंख्य लोकांची उपजीविका देवस्थानावर अवलंबून आहे. त्याअनुषंगाने सर्व नियम,मान्य करून देवस्थाने, भजन, किर्तन सुरू करावे हि सर्वांची एकमुखाने मागणी होती. म्हणून भाजपच्या प्रदेशच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.भारती पवार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, मा.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गडाच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी सप्तशृंगी गड व परिसरातील मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते गोविंद कोठावदे, सरचिटणीस विश्वास पाटील, जि.का.सदस्य सचिन सोनवणे, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली जाधव, सरचिटणीस कृष्ण कुमार कामळस्कर, किसान आघाडी अध्यक्ष काशिनाथ गुंजाळ, उपाध्यक्ष मोती.वाघ, हेमंत रावले, गोरख पवार, वाघ सर,यतिन पवार, युवा मोर्चा अध्यक्ष हितेंद्र पगार ,प्रविण रौंदळ, दिनेश आहेर, चिटणीस रामकृष्ण पगार, ऊमेश पगार, रुपेश शिरोडे, अमित देवरे, चंद्रकांत पवार, संतोष आहेर, पंकज पवार, सुनिल पवार, रविंद्र पवार, शहराध्यक्ष प्रकाश कडवे, विनायक दुबे, पुरोहित संघ समाज बांधव, गोरख पवार, समाधान वाघ, संतोष आहेर, मिलिंद दिक्षीत, प्रकाश जोशी आदी कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित होते.