नाशिक|नाशिकचे सुपुत्र दत्तू भोकनळ यांना राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारातील मानाचा असा 'अर्जुन पुरस्कार' आज घोषित झाला. त्याचे राज्य शासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
नाशिकचे दत्तू भोकनळ याचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन तिथे रोइंग शिकला आणि त्यानंतर ऑलिम्पिक असो, आशियाई क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर आंतरदेशीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. रिओ ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्ण असा त्याचा हा आलेख उंचावणारा आहे. यातून नवखेळाडूंना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.