Skip to main content

गणेशोत्सव, मोहरम घरातच साधेपणाने साजरे करा: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद|कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि प्रादुर्भाव वाढणार नाही यांची दक्षता घेत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण सामाजिक भान राखत साधेपणाने घरातच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
Ganesh-festival-gudlines
फोटो: भास्कर निकाळजे
आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव व मोहरम मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्येक्षतेखाली एम.जी.एम.महाविदयालयाच्या  रूख्मिनी सभागृहत पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक  गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पैठण) गोरख भामरे, विभागातील  पोलीस अधिकारी, भगवान फॉर्मसी महाविदयालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाले,  जिल्हा, तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचयात, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य संबधित गावाचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, आपण दरवर्षी सण-उत्सव मोठया उत्सावाने साजरे करीत असतो. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट असून या संकटाने आपल्या सर्वांना खुप काही शिकवले आहे. कोरोनामुळे आपल्या जीवणाची दशा आणि दिशा बदलेली आहे. पोलीस प्रशासन आणि पोलीसांनी सैनिकांप्रमाणे काम करीत माणुसूकीचे दर्शन घडविले आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच बऱ्याच गावांतील गणेशोत्सव मंडळानी यावर्षी हे सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला त्यांचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी कौतूक केले. त्याच बरोबर जे गणेशोत्सव, मोहरम साजरा करीत आहे त्यांनी मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करीत प्रशासकीय सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. कोरोना संकटातून बाहेर पडतांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून उद्योगांना उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठा योजना, कृषी क्षेत्र यांना नवसंजीवनी  देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती पाटील म्हणाल्या की, गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन करावे. तसेच मनात भक्तीभाव ठेवून घरीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.  शासनाच्या या आवाहनास सर्वांनी पाठींबा दर्शविल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. तसेच कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचेही  अभिनंदन केले. 

श्रीमती पाटील म्हणाल्या की, आतापर्यंत आपण सर्व सण घरातच शांतपणे साजरे करून सहकार्य केले आहे. कोरोना संकट काळात हातावर पोट असनारे खुप अडचणीत आहे तेव्हा आपण उत्सव साजरा करतांना सकारात्मक विचार ठेवून गरिबांना मदत करीत भक्ती दाखवून देऊ शकतो. तेव्हा सर्वांनी आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करीत व गणपती विसर्जनावेळीही गर्दी टाळायची आहे. सर्व गणेश मंडळासाठी गणपतीची मुर्ती 4 फुट तर घरगुती गणेश मुर्ती 2 फुटांची असावी. विसर्जनाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वाहनातून या गणेशमुर्ती व्यवस्थित विसर्जन केले जाईल. त्याचबरोबर इतर मार्गदर्शक सूचना स्थानिक पोलीस स्टेशन व औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस यांच्या फेसबुक वर उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव  काळात मिरवणूका, सांस्कृतीक कार्यक्रम,  भंडारा यांना परवानगी नाही. तरी आपण डिजिटल सण साजरा करू शकतो. यासाठी ऑनलाईन रांगोळी स्पर्धा, निबंध, सेल्फी वीथ ट्री यासारख्या स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना घरपोच पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही श्रीमती पाटील यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी गृहविभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच काही गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीतून गरिबांसाठी मास्क, सॅनिटायझर देणे, रक्तदान, प्लाझ्मा दान याबाबत जनजागृती करीत नियम व शिस्त पाळत गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. 
यावेळी भगवान फार्मसी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाल यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने शाडूच्या गणेश मुर्तींची स्थापना करण्यास सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्तींचे  घरच्या घरी पर्यावरणपुरक विसर्जनाची पद्धत समजावून सांगितली. ज्यात एका बादलीत मुर्तीच्या वजनानुसार अमोनियम बाय कार्बोनेट व त्याच्या पाचपट पाण्यामध्ये श्रींच्या मुर्तीचे विसर्जन केल्यास 48 तासांत मुर्ती विरघळुन जाते, विसर्जनाची ही पद्धत वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...