- सोशल डिस्टन्सींग पाळून त्र्यंबकेश्वरला धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय - TheAnchor

Breaking

August 18, 2020

सोशल डिस्टन्सींग पाळून त्र्यंबकेश्वरला धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय

त्र्यंबकेश्वर|  त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासुन बंद असलेले धार्मीक विधी सुरू करण्याचा निर्णय त्र्यंबक-ईगतपुरीचे आ.हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यासाठी कलम १४४ तसेच इतर नियम काटेकोर पद्धतीने पाळण्याच्या सूचना आ.खोसकर यांनी लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहे.
Decision-to-start-religious-rituals-in-Trimbakeshwar-by-observing-social-distance
कोवीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून त्र्यंबकेश्वर मंदीरासह धार्मीक विधी कालसर्प शांती, नारायण नागबली आदी विधी बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय देखील बंद होते. त्यात प्रामुख्याने पुरोहित मंडळींकडे काम करणारे आदिवासी तसेच इतर कामगार, शहरातील कापड व्यापारी,फुल, भांडी, नागाची प्रतिमा विकणारे सोनार, लोजिंग व्यवसाय आणि इतर अनेक व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ आली होती, त्याअनुषंगाने आ. हिरामण खोस्कर यांच्याध्यक्षतेखली एक पुरोहित, महसूल, पोलिस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Trabankeswar
त्यात पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करुन सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तंतोतंत पाळून एक नियमावली सादर करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक प. गिरसे, सीईओ संजय जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी भिमाशंकर ढोले यांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने आज कुशावर्ततीर्थ येथे सोशल सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावली प्रमाणे आ. हिरामण खोसकर यांनी विधी सुरू करण्याच्या सूचना पुरोहित मंडळींसह प्रांत अधिकारी चव्हाण, तहसीलदार गिरासे, सीईओ संजय जाधव यांना करण्यात आल्या आणि कलम १४४ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना ही पोलिस सहायक निरीक्षक करपे यांना केल्या.

याप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषो्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कन्नव, विजय गांगुर्डे, पुरोहीत संघातर्फे डाॅ दिलीप जोशी,गिरीष जोशी,मोहन लोहगावकर, प्रसन्ना जोशी, राहुल फडके, पंकज धारणे, मंगेश दिघे, गटनेते समीर पाटणकर नगरसेवक सागर उजे आदिंसह काही व्यापारी उपस्थित होते.