अलिबाग| महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजलपुरा भागात ५ मजली इमारत आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पत्त्यासारखी कोसळली आहे. या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. सुमारे ७० ते ८० रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर १५ लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांचे बचावकार्य सुरू आहे.
![]() |
फोटो क्रेडिट: डॉ. बिनू वर्गेश |