- 🌹🌳"जंगल - निसर्ग"🌳🌹 - TheAnchor

Breaking

August 16, 2020

🌹🌳"जंगल - निसर्ग"🌳🌹

Jangal-nisarg-must-read-poem-nice-poem-from-poet-g-p-khairnar-nashik
फोटो:जी पी खैरनार


डोंगरावर पडे पावसाच्या सरी ! 
हिरवागार निसर्ग अंघोळ करी !!
धो धो कोसळती श्रावण सरी !
धावत जाई खोल खोल दरी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी !
जंगल भटकंती कराच खरी !!

पाऊस धारा वाहे डोंगरावरी !
झिरपत जाई डोंगर कपारी !!
झुळु झुळु वाहे नदी किनारी !
पशु पक्षांची तहान होई पुरी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी !
जंगल भटकंती कराच खरी !!

रानात असे जीव श्रुष्टी न्यारी !
जोमात वाढे पीक गहु बाजरी !!
भरदार कणीस चवीस भारी !
हुरड्याचे कणीस असे ज्वारी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी!
जंगल भटकंती कराच खरी !

हिरवीगार शालू घेऊन उरी !
मखमली धरा अंगी पांघरी !!
गुलाबी गारव्यात राम प्रहरी !
आनंदी दिसे पशु पक्षी सारी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी !
जंगल भटकंती कराच खरी !!

चिमणी पाखरे किलबिल करी !
सजीवांना सांगे उठा लवकरी !!
सकाळ झाली पहा तर खरी !
सोनेरी छटा दिसे भूतलावरी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी!
जंगल भटकंती कराच खरी 

कोकिळा कुहू कुहू गायन करी !
पक्षी घेई नभी आनंद भरारी !!
झाडे झुडपे डोले डोंगरावरी !
पाऊस वारा झेलती अंगावरी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी !
जंगल भटकंती कराच खरी !!

वाघोबा साऱ्या जंगलात फिरी !
घर असे त्याचे डोंगर कपारी !!
वाघोबा असे जंगली शिकारी !
सावज दिसता शिकार करी !!
नद्यांचा निसर्ग वनात भारी !
जंगल भटकंती कराच खरी !!

🌹🌳🌲🌴🌴🌲🌳🌹
कवी:-जी.पी.खैरनार, नाशिक

९४२१५११७३७ / ७०८३२३५०२१