- पुणतांबा येथे मनसेतर्फे नागरिकांना मास्क वाटप - TheAnchor

Breaking

August 18, 2020

पुणतांबा येथे मनसेतर्फे नागरिकांना मास्क वाटप

पुणतांबा| प्रतिनिध| राहता तालुक्यातील पुणतांबा  नवनिर्माण सेनेच्या मार्फत रोजनदारी करणाऱ्या नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
MNS-distributes-masks-to-citizens-at-Puntamba
फोटो: मधु ओझा

सालाबादप्रमाणे 74 वा स्वातंत्रदिवस हा कोरोनामुळे धुमधडाक्यात साजरा करण्यास मर्यादा आल्या असल्याने गावात फिजिकल डिस्टनिग राखत ध्वजारोहणचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यात पुणतांबा येथील नवनिर्माण सेनेच्या राहाता तालुका उपाध्यक्ष गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा शहराध्यक्ष संदीप लाळे,संजय सोनवणे,कमलेश महंकाळे,आदित्य घोडेराव,याच्यासह कार्यकर्ते शासनाच्या सर्व नियमाचे पालन करत रोजनदारी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या कुटुंबाला मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच या नागरिकांना कोरोना बाबत काय खबरदरी घ्यावी,कामाच्या ठिकणी दोन व्यक्तीमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून काम करावे,वारंवार साबणाने हात स्वच्छ धुण्याची मार्गदर्शक सूचनापर मार्गदर्शन केले.शेवटी पुणतांबा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष संदीप लाळे यांनी उपस्तित नागरिक,पदाधिकारी यांचे आभार मानले .