- मनसेने निवेदन चिकटवले खुर्चीला; ग्रामसेवक नसल्याने कार्यकर्ते संतप्त - TheAnchor

Breaking

August 21, 2020

मनसेने निवेदन चिकटवले खुर्चीला; ग्रामसेवक नसल्याने कार्यकर्ते संतप्त

मधु ओझा
पुणतांबा| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुणतांबा ग्रामपंचायतीवर धडकले आणि रस्त्याच्या दुरुस्तीचे निवेदन देण्यासाठी आत गेले मात्र याठिकाणी ग्रामसेवक नसल्याने खुर्चीलाच निवेदन चिकटवून अभिनव आंदोलन करत संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यानी तीव्र घोषणाबाजी केली.
Mns-road-andolan
फोटो: मधु ओझा
पुणतांबाच्या मुख्य रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, असे असतानाही सदर ग्रामसेवक व ग्रामपंचायततर्फे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. तसेच पूरक पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ही उडवाउडवीची उत्तरे देतात. गावात  खड्डे पडल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, ग्रामपंचायत लोकांना वेठीस धरण्याचे काम ग्रामपंचायत करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

सदर रस्त्याची दुरुस्ती लवकर झाली नाही तर आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणतांबा ग्रामपंचायतला टाळे ठोकले शिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी मनसेचे उपतालुका अध्यक्ष गणेश जाधव, शहराध्यक्ष संदीप  लाळे, उपशहराध्यक्ष संजय सोनवणे, शेतकरी मनसे पदाधिकारी वाल्मीक घोडेकर, शहर संघटक सनी टोरपे उपस्थित होते.