नाशिक| केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन अँण्ड कस्टम विभागातर्फे नाशिकला राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय कुरिअर हब बनविण्यास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन जीएसटी (कस्टम) आयुक्त अविनाश थेटे यांनी चेंबरच्या शिष्टंडळाला दिले.
![]() |
फोटो क्रेडिट:अविनाश पाठक |
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रीकल्चरच्या नेत्तृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय कुरिअर हब संदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या हस्ते नाशिकचे जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना जीएसटी (कस्टम) आयुक्त श्री. अविनाश थेटे यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर हब होण्यासाठी नाशिकला पोषक वातावरण आहे उद्योगाबरोबरच अग्रीकल्चर मालालाही जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविणे आणि वेळेत माल पोचविणे शक्य होणार असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय कुरिअर हब लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन प्रतिनिधींना दिले.
याप्रसंगी कस्टम सहआयुक्त श्री. महिपालसिंग, सहाय्यक आयुक्त श्री. आर के जैन आणि हॅल्कॉनचे सीईओ श्री. सुधाकर सेन यांचा सत्कार श्री. ललित बुब, श्री. सी एस. सिंग , श्री. यतीन पटेल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी नाशिकला श्री. थेटे यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कुरिअर हब जाहीर झाल्याबद्दल श्री. थेटे यांचा सत्कार व अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. जागतिक बाजारपेठेत राज्यातील व नाशिकच्या व्यापारी उद्योजकांना संधी मिळावी व्यापार उद्योग वाढावा यासाठी चेंबरने केलेल्या विविध देशांचे दौरे तेथील चेंबरबरोबर केले करार व बिझनेस उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे नाशिकला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर हबचा मोठ्या प्रमाणात नाशिक व जवळपासच्या शेतकरी, व्यापारी उद्योजकांना होईल व त्यांचा पैसा व वेळ वाचून फायदा होऊन व्यापार-उद्योगाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल व जगाच्या हवाई नकाशावर नाशिकचे नाव येईल त्याचा निश्चितच नाशिकला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.
नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सी. एस. सिंग नाशिकच्या व्यापारी, उद्योजक शेतकऱ्यांना माल पाठवायचा असेल तर मुंबई शिवाय पर्याय नाही त्यासाठी नाशिक कार्गो व्हावे, विमानसेवा सुरु व्हावी म्हणून सर्वजण प्रयत्नशील होते. नाशिकला विमानसेवा सुरु झाली मात्र पूर्णपणे सुरु नसल्याने अडचणी आहेत तरी सुद्धा नाशिकहून प्रदेशात माल मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. नाशिकला आंतरराष्ट्रीय कुरिअर हब सुरु होत असल्याने त्याचा परिणाम नाशिकच्या व्यापार उद्योगाला जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट करण्यास मदत होणार असल्याचे श्री. सिंग म्हणाले.आयमाचे सरचिटणीस श्री ललित बूब, श्री सुरेश माळी, नाशिक कस्टम ब्रोकर असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सी. एस. सिंग, श्री यतीन पटेल,श्री. वेदांशु पाटील, सचिव चंद्रकांत दीक्षित, अविनाश पाठक उपस्थित होते.