- पुरुषोत्तम कडलग: सामजिक जाणिवेचा युवानेता - TheAnchor

Breaking

August 22, 2020

पुरुषोत्तम कडलग: सामजिक जाणिवेचा युवानेता

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुका तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मजबूत बांधणी असलेला भाग, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आदरणीय खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या विचारांवर प्रेम करणारे अनेक लोक येथे आहेत, त्यात त्र्यंबकेश्वर येथील कडलग कुटुंबीयांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भुजबळ समर्थक पुरुषोत्तम कडलग यांनी सामान्य कार्यकर्ता ते युवक जिल्हाध्यक्ष असा प्रवास स्वतःच्या हिंमतीवर केला आणि वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला. 
Purushottam-kadlaga-ncp-nashik
फोटो: पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष रा.यु.का नाशिक
समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वडील माजी नगरसेवक मधुकर बापू कडलग आणि आई माजी नगरसेविका अंजना कडलग यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच पाठीशी होते. इ. १२ वीत विज्ञान विषय घेऊन पास झाल्यावर पुढे त्यांनी के.के.वाघ इंजिनियरिंग महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण घेतले, मात्र पुढील शिक्षणात त्यांचे मन करमेना, त्यांची ओढ सामजिक कार्यात अधिक होती. गरजूंच्या मदतीला धावून जाणे, येणाऱ्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणे, फारसा गाजावाजा न करता शांतपणे आपले कर्म करत राहणे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. हाच दृढ विश्वास आत्मविश्वासात परिवर्तित होत हळूहळू जीवाला जीव देणारे अनेक साथीदार त्यांच्यासोबत जोडले गेले, मैत्रीचं हे वैभव फार थोड्या युवा नेत्याच्या पदरी येते पुरुषोत्तम भाऊ त्याबाबतीत नशीबवान ठरले. 

राष्ट्रवादीचे प्रमुख खा.शरद पवार यांच्यासोबत
२०१४ ला सत्तांतर झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी बाकांवर बसावे लागले, त्याच दरम्यान नाशिक जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांना देखील राजकीय षडयंत्रामुळे तुरूंगात जावं लागलं. अशा कठीण काळामध्ये २०१७ ला नासिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पुरुषोत्तम मधुकर कडलग यांच्या हाती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली. सन २००६ ते २०१० आणि २०१३ ते २०१७ या कालावधीत दोन वेळेस त्र्यंबक तालुका अध्यक्षपदाचा अनुभव होताच. मात्र आताची जबाबदारी ही मोठी होती. यापूर्वीच्या संघटनात्मक पदांवर असताना पक्षबांधणी व पक्षवाढीमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण करणाऱ्या पुरुषोत्तम कडलग यांची निवड योग्य असल्याचे दाखवून देण्याचे आव्हान होतं, जिवलग कार्यकर्त्यांच्या साथीने त्यांनी ती सार्थ ठरवली, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आणि समता परिषद आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप खैरे यांचे ही भक्कम पाठबळ लाभले.
त्यामुळे कार्यतत्पर अशी ओळख ठेवत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर युवक संघटनेत नवचैतन्य निर्माण करुन पक्षाला उभारी दिली. बेरोजगारी, इंधन दरवाढ, महागाई, करवाढ असो असे सामान्य जनतेच्या प्रश्नावर आक्रमकपणे आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळावा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करावे यासह इतर प्रश्नांसाठी आंदोलनं केली. पर्यावरण विषय त्यांचा जिव्हाळ्याचा वेळ मिळेल तेव्हा झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम नित्याचीच होती. त्र्यंबकेश्वर परिसरात १० ते १२ लाख बीजारोपण मोहीम ही पर्यावरणाप्रती त्यांची आस्था आणि प्रेम दर्शविणारी आहे. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा गावपातळीवर स्थापण्यास प्राधान्य दिले, आणि मोठ्या प्रमाणात शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  युवावर्गाची ताकत संघटनेच्या पाठीमागे उभी केली. चांदवड, देवळा, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, सटाणा, सिन्नर, येवला याठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा गावपातळीवर सुरू केल्या. पाचशेपेक्षा अधिक शाखा या उपक्रमातून गावपातळीवर सुरू केल्या, या शाखेच्या माध्यमातून मोठा युवावर्ग संघटनेच्या पाठीमागे ताकदीने उभारला. या युवा जिल्हाध्यक्षा बद्दल एक अतिशय सर्रासपणे वापरले जाणारे गौवोद्गार म्हणजे जिल्हाध्यक्ष असावे तर असे वेळप्रसंगी आक्रमक, कर्तव्यदक्ष आणि हजरजबाबी, तर कधी संयमी, कार्यकर्त्यांसाठी सदैव उपलब्ध. कोणतीही समस्या असो मग ती गावपातळीवरील असो अथवा मंत्रालयस्तरीय प्रत्येक कार्यकर्त्यांची समस्या दूर करण्यासाठी धडपडणारा असा नेता. गावपातळीवरील शाखांमुळे जिल्हाध्यक्षांचा संपर्क हा थेट जिल्ह्यातील प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचला. नाशिक जिल्ह्यात असे एकही गाव नाही जिथे जिल्हाध्यक्षांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट नाही, प्रत्येक गावात जिल्हाध्यक्षांनी संघटनेसोबत युवा वर्ग जोडला आणि या युवावर्गाने आपली ताकत 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात दाखवली. 
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासोबत
युवावर्ग पक्षाशी जोडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच पक्षाची ध्येयधोरणे समजवण्याचे काम ते सहजतेने केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरोगामी विचारधारा मानणारा, पक्षाची महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता सुरू असलेली कामे तळागाळात पोहचवण्याचे काम देखील निष्ठेने करत आहेत. त्यात युवावर्गाला मोठ्या प्रमाणात जोडत पक्षाची ध्येयधोरणे कळावी यासाठी मार्गदर्शन शिबिरे त्यांनी आयोजित केली. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं. माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बूथ संकल्पना युवा कार्यकर्त्यांपर्यंत रुजविण्यासाठी शिबिरं घेतली.त्यात २२ मार्च २०१८ रोजी उत्तर महाराष्ट्र युथ कमिटी संकल्प मेळावा विशेष होता. त्यातून बूथ कशाप्रकारे पक्षाला यश मिळवून देऊ शकतो याबद्दलची जाणीव कार्यकर्त्यांना करुन दिली. 
त्याचा प्रत्यय 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. "वन बूथ टेन युथ" ही संकल्पना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली आणि जोडल्या गेलेल्या युवावर्गाला एक दिशा दिली. पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्ह्यांमध्ये बड्या नेत्यांचे आयाराम गयाराम सुरू होतं. अशा नेत्यांच्या वळचळणीला न जाता न डगमगता युवा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिला. त्याचे श्रेय जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांना जाते, त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यात मोलाचा हातभार लागला. 
पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना

तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळ यांना २२ हजार मतांनी विजय मिळाला होता त्यासाठी कडलग यांचीही मेहनत होती. त्यांच्या माध्यमातून त्र्यंबक तालुक्याचा वाटा होता. २०१४ लोकसभा निवडणुकीत ना. भुजबळ यांना १४५००ची आघाडी मिळवून देण्यात सहभाग होता, २०१९ पुन्हा समीर भुजबळ यांना ११ हजार मतांच्या आघाडीसाठी परिश्रम होते. २०१९ ला इगतपुरी-त्र्यंबक मतदार संघातून हिरामण खोसकर यांना तालुक्यातून आघाडी मिळवून देण्यात सक्रिय सहभाग राहिला आहे. भाजप बहुल त्र्यंबक नगरपालिकेत दोन वेळा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात यश मिळवले,तसेच २०१५-२०१६ ला अलका शिरसाट यांची नगराध्यक्षपदी वर्णी लावण्यात प्रयत्नशील राहिले.
आ. हिरामण खोसकर यांच्यासमवेत


पक्ष विरोधी बाकावर असल्यावर कार्यकर्त्यांनी आक्रमक असले पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी प्रत्येक आंदोलनांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन आक्रमक पद्धतीचे आंदोलन करून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. युवा वर्गासाठी एक कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू अशा खोट्या वल्गना भारतीय जनता पार्टीने केल्या त्याच्याविरोधात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष संग्रामदादा कोते यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाच्या माध्यमातून युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सरकार दरबारी मांडला. प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करून युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सरकार दरबारी पोहचण्याचे काम केले. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांनी एकत्रितपणे उच्च व तंत्र शिक्षण विभाग नाशिक जिल्हा यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. 
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, केंद्र शासनाच्या निर्यातबंदीच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव गडगडले त्यावेळेस नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कांदा वाटप करून केंद्र शासनाचा निर्णयांचा निषेध नोंदवला. जेएनयूमध्ये एका विद्यार्थिनीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली, याघटनेचा निषेध म्हणून नाशिक एबिवीपीच्या कार्यालयामध्ये घुसून या घटनेचा निषेध कडलग यांनी नोंदवला.
तत्कालीन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपण बारामतीमध्ये सुद्धा निवडून येऊन अशी वल्गना केली, त्याला प्रतिउत्तर देत जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी त्यांना बारामतीमध्ये डिपॉझिट वाचवून दाखवा आणि एक कोटीचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्यातून घेऊन जा असे खुले आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय खा.शरद पवार साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मोठे केले मंत्रिपद देऊन राजकारणामध्ये सक्षम बनवलं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सत्तेतून पायउतार होताच अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे काम सुरू केले. आणि स्वतःच्या स्वार्थापोटी इतर पक्षांना आपलंसं केलं. अशा नेत्यांना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी नाशिक जिल्ह्यात पाय ठेवला तर गाठ माझ्याशी आहे अशी तंबी भरली. यासाठी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवा वर्गाचा खंबीर पाठींबा मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातला युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दिसले. 



2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी जिल्ह्याचा किमान पाच वेळा दौरा केला आणि कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवला. गाव गट गण तालुका जिल्हा पातळीवरती सातत्याने मार्गदर्शनाचे कार्यक्रम मेळावे मीटिंग आयोजित करून युवा वर्गाची संपर्क सुरू ठेवला. तालुका अध्यक्षांना जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांना ते करत असलेल्या कामांबद्दल प्रोत्साहन दिले. कामांमध्ये अडचणी आल्या तर त्या दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीची पाळंमुळं नाशिक जिल्ह्यामध्ये भक्कम झाली. 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले.
या प्रयत्नांमुळेच आघाडीचे सात आमदार ज्यामध्ये सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व एक आमदार काँग्रेस पक्षाचे (मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य) जिल्ह्यातून विधानसभेवर की पाठवले. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी एक सक्षम तालुकाध्यक्ष म्हणून विधानसभेची सुनील आहेर यांना उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले. काँग्रेस पक्षाने सदरचा मतदार संघ न सोडल्यामुळे उमेदवारी पक्षाला देता आली नाही, पण जिल्हाध्यक्षांनी घेतलेले कष्ट जिल्ह्यातील सर्व सामान्य कार्यकर्ता आपल्या नजरेखालून घालत होता. जिल्हाध्यक्षांचे प्रयत्न बघून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अतिशय सक्षम जिल्हाध्यक्ष भेटल्याची भावना निर्माण झाली.
संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांचे अभिनंदन करतांना
राष्टरवादीत युवक काँग्रेस पक्षातील युवा कार्यकर्त्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. युवक संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळावा यासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या अभिप्राय अभियानात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे हा माझा पक्ष आहे अशा पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला.
त्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या मायभूमी विषयी विशेष आदर आहे. संसदेत खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतांना शेवटी जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली त्याला उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी निषेध नोंदवत १ लाख पत्रे त्यांना पाठविली आणि आपल्या अस्मितेबाबत कोणताही समझोता करणार नाही.असा खंबीर बाणा दाखवून दिला.अशा दिलेर, दिलदार मनस्वी युवा नेत्याचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा!