
नाशिक| लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) असून येथे मोठ्या प्रमाणात कांदा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला आदींचा व्यापार देशासह जगभरात केला जातो. त्यामुळे केंद्रासरकार मार्फत नुकतीच शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी जी किसान रेल्वे सुरू केली त्याचा थांबा लासलगाव येथे द्यावाअद्यावा अशी मागणी रेल्वे कडे केली आहे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मधील शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी मदत होईल. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील तसेच नाशिक जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता किसान रेलला लासलगाव येथे थांबा देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे अशी मागणी मध्य रेल्वेचे मंडळ व्यवस्थापक, भुसावळ यांना पत्राद्वारे केली आहे.

