चंद्रपूर| ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
![]() |
त्यानंतर उपचारासाठी त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर मृत घोषित केले. त्यांनी विषचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्या आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या, महारोगी सेवा समितीच्या ही त्या सीईओ म्हणून काम बघत होत्या. त्या मानसिक तणावात असल्याचं ही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.
