Skip to main content

वैज्ञानिक निकषांची खात्री करूनच सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली| सरकार लस निर्मितीच्या कार्याकडे अगदी बारीक लक्ष ठेऊन आहे. भारतीय लस विकासक आणि जागतिक नियामक, इतर देशांची सरकारे, बहुपक्षीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्याबरोबर योग्य पद्धतीने सरकार संपर्क साधत असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा एकदा दिली. बाजारात लस आणताना त्यासंबंधी आवश्यक वैज्ञानिक निकषांची पूर्तता झाली आहे की नाही, याची खात्री करूनच सर्व नागरिकांपर्यंत ही लस पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मोदी यांनी सांगितले. कोविडविरूद्धच्या लढाईमध्ये प्रत्येक जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले, त्याचप्रमाणे प्रत्येकापर्यंत सुरळीत, पद्धतशीर,  लस पोहोचवणे  सुनिश्चित करण्यासाठी प्राधान्य देणार येईल, हे कार्य करण्यासाठी सर्व स्तरावर सरकारला एकत्रितपणे काम करावे लागणार आहे.

Arrangements-for-delivery-of-vaccine-to-all-citizens-by-ensuring-scientific-criteria-Prime-Minister-Narendra-Modi
फोटो: फाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. 24 नोव्हेंबर,  2020 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यासह उच्चस्तरीय बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांमधील कोविड-19 विषयीची स्थिती आणि सज्जतेविषयी प्रतिसाद आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. यामध्ये हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. कोविड-19 प्रतिबंध लस देणे, तिचे वितरण आणि  त्यासाठीची प्रशासकीय  कार्यपद्धती यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली.

 

आरोग्य विषयक पायाभूत सुविधा तयार करण्याचे काम वेगात

संपूर्ण देशभर कोरोनाचा उद्रेक झालेला असताना सर्वांनी ठोस प्रयत्नाने या रोगाचा सामना केला आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण, त्याचबरोबर कोरोना मृत्यूदर कमी करण्यात यश मिळवले. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची परिस्थिती चांगली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी चाचण्या आणि उपचार यांच्यासाठी  संपूर्ण देशभरामध्ये कशा पद्धतीने जाळे तयार करण्यात आले आहे, याची माहिती दिली. यावेळी त्यांनी ‘पीएम केअर्स’ निधीच्या या संदर्भातील वापराची माहिती  दिली . सर्वत्र ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी या निधीचा वापर करण्यात आल्याचेही सांगितले. ऑक्सिजन निर्मिती करण्याच्याबाबतीत सर्व वैद्यकीय महाविद्यालया आणि जिल्हा रूग्णालये आत्मनिर्भर व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशभरामध्ये 160 नवीन ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

लोकांच्या प्रतिसादाचे चार टप्पे

या महामारीविषयी लोक कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत, हे समजून घेणे महत्वाचे ठरणार असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले, या प्रतिसादांची विभागणी चार टप्प्यांमध्ये करता येईल. सर्वात प्रथम तर सर्वांना भीती वाटत होती, त्यामुळे लोक घाबरले, अस्वस्थ झाले आणि त्याप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. दुस-या टप्प्यामध्ये या विषाणूबद्दल असंख्य शंका व्यक्त होऊ लागल्या. त्यामुळे अनेकजण आपल्याला आजार झाला आहे, हे लपवून ठेवायला लागले. तिस-या टप्पा हा स्वीकारण्याचा आहे. या काळामध्ये लोक अधिक गंभीर झाले, या आजाराचा प्रसार कसा होतो, साथ कशी वाढतेय याचा त्यांनी स्वीकार केला आणि त्याप्रमाणे उपचार करून घ्यायला प्रारंभ केल्यामुळे आपोआपच रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. आजाराविषयी चुकीच्या कल्पना प्रसारित होत असल्याचे त्यामुळे लक्षात आले. त्यामुळे विषाणूविषयी सगळेजण अधिक सजग झाले. आता चौथ्या टप्प्यामध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आपण दुर्लक्ष केले तर रूग्णसंख्या वाढतेय हेही सर्वांच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे दक्षता घेणे, विषाणूला गांभीर्याने घेणे, जागरूकता वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.  देशामध्ये ज्या राज्यांमध्ये महामारीचा प्रादूर्भाव आधी कमी होता, त्या भागांमध्येही आता रूग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने अधिक सर्तक राहून सावधगिरी बाळगण्यची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद करून रूग्णाला घरामध्येच विलगीकरणामध्ये ठेऊन त्याची चांगली देखभाल करण्याची गरज आहे. त्याचबरोबर गाव पातळीवर सुसज्ज आरोग्य केंद्रे  आणि विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जागरूकता मोहीम राबविणे महत्वाचे आहे. सरकारने कोरोना मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

लस पोहोचविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी राज्यांशी सल्ला मसलत करून निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर लस साठवणुकीसाठी अतिरिक्त शीतगृहांची शृंखला तयार करण्याची आवश्यकता असणार आहे, त्याविषयीही राज्यांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. लस सर्वत्र पोहोचि‍वण्याचे  काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी राज्यांनी राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि राज्य तसेच जिल्हास्तरीय कार्य दलांची स्थापना करून नियमित निरीक्षण करण्यात यावे, अशी सूचना  पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली.

लसीसंबंधी अनेक मिथकांचा प्रसार होत आहे. मागील अनुभव लक्षात घेता, लसीच्या परिणामांविषयी अनेक प्रकरच्या अफवाही पसरल्या जाऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टींवर सर्वात महत्वाचा उपाय असतो तो म्हणजे समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा! म्हणूनच सर्वांनी लसीविषयी जनजागरण करण्यावर भर देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय समाज सेवा असे समूह आणि प्रसार  माध्यमांतून जागरण करण्यास त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...