Skip to main content

डॉ.तात्याराव लहाने यांचा प्रतिष्ठेच्या 'महात्मा फुले समता पुरस्काराने' गौरव

नाशिक|पुणे| महात्मा जोतीराव फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्ताने आज पुणे समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा हा कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत पार पडला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष,मानपत्र, शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह याचा समावेश आहे.
Dr-Tatyarao-Lahane-honored-with-the-prestigious-Mahatma-Phule-Samata-Award'

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आ.पंकज भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी आमदार जयदेव गायकवाड, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, प्रा.हरी नरके, रविंद्र पवार, शिवाजीराव नलावडे, डॉ.विठ्ठल लहाने, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे,राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डी.वाय.पाटीलचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, डॉ.शेफाली भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, पंढरीनाथ बनकर, अविनाश चौरे,मनीषा लडकत, प्रा.गौतम बेंगाळे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सुख दु:खात अडचणीत काम करण्याच बळ मिळते ते उर्जा केंद्र महात्मा फुले वाडा आहे. डॉ. तात्याराव लहाने यांनी लाखो नागरिकांना नजर पुन्हा एकदा मिळवून दिली. त्याप्रमाणे त्या काळात बहुजन समाजाला दृष्टी देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. केवळ नजर असून तुम्ही समाजासाठी काही करू शकत नसाल तर त्या नजरेचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते असे ते म्हणाले, ते म्हणाले कि, देशातील मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. त्यानंतर जालना येथील पहिल्या सभेत मंडल आयोग लागू करण्याची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन  मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोग लागू करून या मागासवर्गीय जनतेला न्याय मिळवून दिला. तसेच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पुण्याच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगीतले.


ते म्हणाले की, इतर मागासवर्गीय समाजाच्या विकासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी उभारण्यात आलेल्या महाज्योतीसाठी तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी,  मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी आम्ही भरीव निधीची मागणी करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मुले व मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, इतर मगासवर्गीय समाजातील बांधवाना घरकुल मिळावं यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना यासह विविध योजनांची मागणी आपण केलेली आहे. तसेच नोकरी मध्ये असलेला मागासवर्गीय समाजाचा अनुशेष भरून काढण्यात यावा अशी आपली मागणी आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने म्हणाले की,  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा मिळलेला हा पुरस्कार मी ज्या बहुजन समाजातून येतो त्या बहुजन समाजातून मिळाला असून त्यांचा मला मनस्वी आनंद आहे. महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगीतले. ज्यांनी किडनी बदलली आहे त्यांना बदलल्यानंतर १० ते बारा वर्षाचे आयुष्य मिळते मात्र मला माझ्या आईने दिलेली किडनी आणि आजवर केलेल्या कामातून मिळालेल्या आशीर्वादातून मला २५ वर्षाहून अधिक आयुष्य लाभले. या कामाबद्दल मला आज महात्मा फुले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझ्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना देतो असेही ते म्हणाले.


ते म्हणाले की, कोविड ला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून त्याच भान ठेवलं पाहिजे. मास्क हे सद्या आपल्यासाठी महत्वाचे व्हॅक्सीन आहे. जगात दुसरी लाट आली असून ती लाट आटोक्यात आणण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. त्यातून आपण या लाटेला सौम्य पद्धतीने रोखू शकतो असे सांगत नेत्ररोग्याच्या चेहऱ्यावर आलेल हासू माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण स्वतःसाठी जगत असतांना समाजासाठी दुसऱ्यासाठी जगल पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.


समता परिषदेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्रा.हरी नरके म्हणाले की, बहुजन समाजाने आज डॉ.तात्याराव लहाने यांचा आज सन्मान केला. म्हणजेच त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचा सन्मान होत आहे असे गौरोदगार त्यांनी काढले. ते म्हणाले की, सद्या काही लोक लोकशाहीच्या चारही स्तंभांना हातात घेऊन काम करत आहे. अशा परिस्थितीत महापुरुषांचे विचार टिकतील का प्रश्न आहे. तरी देखील अशा परिस्थितीत तात्याराव लहाने यांच्या सारखे डॉक्टर न डगमगता आपली सेवा करत असून त्यांचे हे काम महान असे आहे. ज्यावेळी पुण्यात आणि महाराष्ट्रात प्लेगची साथ आली होती त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी घरोघरी जाऊन लोकांसाठी काम केले अशी आठवण त्यांनी संगीतली आणि आज तोच वारसा घेऊन डॉ. तात्याराव लहाने हे काम करत आहेत आजच्या या विपरीत परिस्थितीत महापुरुषांचे विचार टिकविण्यासाठी आपल्याला क्रांतीकारी काम करावे लागेल असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमावेळी श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी तर प्रा.नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...