मुंबई| शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाचं पथकाकडून ( ईडी) कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याच सांगितलं आहे. घर, कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारल्याचे सांगण्यात येते.
आज दिल्लीतील ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरी दाखल झाले. एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरात शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु असून चौकशी केली जात आहे. दरम्यान आ.प्रताप सरनाईक सध्या परदेशात असून. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणात आ. प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही कारवाई होत असल्याची शिवसेनेच्या गोटात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांनी राजकीय वातावरण मात्र चांगलच तापलं आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोप
प्रताप सरनाईक साधुसंत नाहीत: राणे
भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील यावर एक प्रतिक्रिया देत अधिक बोलणं टाळलं. “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,” असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.
किती ही दबाव आणला तरी २५ सरकारला भीती नाही: राऊत
कोणी कितीही दबाव आणला, दहशत निर्माण केली. तरीही पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
चूक नसेल तर घरण्याचे कारण नाही: फडणवीस
ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जो बोलेल त्याला ईडीची भीती: भुजबळ
विरोधीपक्षातील एखादा नेता जो व्यक्ती
केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते बोलत होत
