नवी दिल्ली| गेल्या 24 तासात, महाराष्ट्रात सर्वाधिक 6,406 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. त्या खालोखाल दिल्लीत 5,475, तर केरळात 5,378 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. गेल्या २४ तासा ४९२ जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे.
![]() |
| फोटो: फाईल |
भारताची सक्रीय रुग्णसंख्या आज 4,55,555 झाली. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णसंख्या 4.89%.आहे.सक्रीय रुग्णसंख्येपैकी 70% (69.59%) रुग्णसंख्या ही 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. ही राज्ये म्हणजे महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ़.
आज महाराष्ट्रातील एकूण सक्रीय कोविड रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 87,014 आहे, त्या खालोखाल केरळातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 64,615 तर दिल्लीतील एकूण सक्रीय रुग्णसंख्या 38,734 आहे. गेल्या 24 तासात भारतात 43,082 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. यापैकी 76.93% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
भारतातील एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने 87लाखांचा आकडा (87,18,517) ओलांडला. रोगमुक्तांच्या संख्येचा राष्ट्रीय दर आज 93.65% राहिला. देशात गेल्या 24 तासात 39,379 जण बरे झाल्याचे नोंदवले गेले. या बरे झालेल्यांच्या संख्येपैकी 78.15% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे.
एका दिवसातील नव्याने बरे झालेल्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे 5,970, तर दिल्लीत 4,937 आणि महाराष्ट्रात त्याखालोखाल 4,815 आहे.गेल्या 24 तासात झालेल्या 492 कोविड मृत्यूंपैकी 75.20% हे दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 91 नवीन मृत्यूसंख्येची नोंद झाली, तर महाराष्ट्रात 65 नवीन मृत्यूसंख्येची नोंद आणि त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये 52 मृत्यू नोंदवले गेले.
