पुणे| कोविडला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून त्याच भान ठेवलं पाहिजे. मास्क हे सद्या आपल्यासाठी महत्वाचे व्हॅक्सीन आहे असे ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगून जनतेला मास्क घालण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, जगात दुसरी लाट आली असून ती लाट आटोक्यात आणण्यासाठी मास्क लावणे आवश्यक आहे. त्यातून आपण या लाटेला सौम्य पद्धतीने रोखू शकतो असे सांगत नेत्ररोग्याच्या चेहऱ्यावर आलेल हासू माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण स्वतःसाठी जगत असतांना समाजासाठी दुसऱ्यासाठी जगल पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
