नाशिक| भोसला मिलीटरी कॉलेजमधील निवासी प्रशासकीय प्रशिक्षण अधिकारी श्री रामबहादूर यादव हे आज (ता.३१) सेवानिवृत्त होत असून त्यानिमित्त सकाळी दहाला भोसला कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये त्याचा सत्कार झाला.
भोसलाच्या निवासी प्रशासकीय प्रशिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. ३० वर्षे सैन्य दलात सेवा करून त्यांनी भोसला महाविद्यालयातही जवळपास सात वर्षे सेवा केली. सैन्यात असतांना त्यांनी कारगील युध्द, नैसर्गिक आपत्ती निवारण इत्यादी विविध उपक्रमात सक्रीय योगदान देत चांगली कामगिरी बजावली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक वर्ग ऑनलाइन स्वरूपात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष हेरंब गोविलकर, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रणव रत्नपारखी उपस्थित होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने ऑनलाइन सहभाग नोंदवावा,असे आवाहन प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी यांनी केले होते.
