नाशिक| नासिक सराफ बाजारातील धर्मकाटा २३ डिसेंबर रोजी ८५ वर्ष पूर्ण होऊन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ग्राहकांसाठी असलेला हा एकमेव असा धर्मकाटा आहे. की सराफ असोसिएशनतर्फे चालविला जातो. साधारणता १८९२ साली परचुरे यांचा धर्मकाटा या ठिकाणी होता. कालांतराने हा नासिक सराफ असोसिएशन घेऊन २३ डिसेंबर १९३५ रोजी धर्मकाटा या नावाने सुरू केला. तेव्हापासून धर्मकाटा ही संकल्पना सराफ असोसिएशनतर्फे एक सेवाधर्म म्हणून राबविली जात आहे.
व्यवसाय आणि सेवा यातील हा एक अनोखा मिलाप धर्मकाटा साधतो आहे. धर्मकाटा हा सराफ बाजारातील व्यवहारावर विश्वार्यता निर्माण करतान दिसतो. त्यामुळेच धर्मकाट्याला सेवाधर्म म्हटले गेले आहे. मौर्य काळातील चाणक्याने कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथात सर्वप्रथम धर्मकाट्याचा उल्लेख आढळतो.
चाणक्याने वर्णल्याप्रमाणे, विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात एक त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संस्थेकडून व्यवहाराची अथवा त्या मालाची पडताळणी करावी. या चाणक्य सूत्रासाठीच प्राचीन काळातही धर्मकाटा ही संकल्पना राबविली जात असावी,असे दिसते. त्यामुळे विक्रता आणि खरेदीदार यांच्यातील सोन्याचांदीचे व्यवहार अधिक विश्वासाने होत राहण्यासाठी सराफ बाजारातील धर्मकाटा हा महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. यामुळे आतापर्यंत सराफ बाजारातील विश्वार्सता टिकून आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे पारदर्शक व्यवहाराची खात्री देणारा धर्मकाटा नाशिक सराफ बाजाराची शान ठरतो आहे.
८५ वर्षाची सेवा आजही सुरूच..
८५ वर्षांपासून आजही आपला धर्मकाटा ग्राहकांच्या सेवेसाठी रोज सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत अविरत सुरू आहे. या सेवेचा लाभ सराफ बाजारात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांनी व विक्रेत्यांनी घ्यायला हवा असे आवाहन करण्यात आले आहे.
चेतन राजापूरकर
अध्यक्ष-नासिक सराफ असोसिएशन