नाशिक| सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता दिलीप यादव भावसार वय 67 यांचे नुकतेच हृदय विकाराने दुखःद निधन झाले. नाशिक, धुळे, नवापूर, सटाणा, भुसावळ आदी ठिकाणी ते कार्यरत होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. निवृत्ती पश्चात उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या बांधकाम, पूल उभारणी, रस्ते प्रकल्पांना त्यांनी स्थापत्य सल्लागार म्हणून मार्गदर्शन केले होते. साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे त्यांना उत्कृष्ट वाचक म्हणून गौरविण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी श्रीमती संगीता भावसार, मुलगा आर्किटेक्ट नकुल, मुलगी, इंजिनिअर सौ मानसी, डॉ. अनुजा, जामात डॉ. निखिल अरबट्टी, डॉ. संकल्प महाजन, स्नुषा इंजिनिअर गरिमा, आणि नातवंडे असा परिवार आहे.
