पुणे| मी कोल्हापूरला जाणार अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र कुणी हुरळून आणि घाबरून जाण्याचं कारण नाही, केंद्राने दिलेले मिशन पूर्ण केल्याशिवाय मी कुठेच जाणार नसल्याचे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिले.
![]() |
| फोटो:फाईल |
तसेच मी कधी ही जाऊ शकतो, त्याला काल मर्यादा नाही असे शेवटी स्पष्ट केले. मात्र केंद्राने कोणते मिशन दिले आहे असे विचारले असता त्यांनी त्याबाबत अधिक बोलणे टाळले, तसेच तुम्ही कोथरूड मधून पून्हा लढणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला ही बगल दिली.
