नाशिक| नाशिक दौऱ्यात आ.रोहित पवार काल यांनी वणी येथील सप्तशृंगी देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी राज्यावरचं आर्थिक व कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी श्री सप्तशृंगी देवी चरणी प्रार्थना केली.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी उपस्थित होते. यावेळी संस्थानच्या वतीने श्री सप्तशृंगी मातेची प्रतिमा आ. पवार यांना भेट देेेऊन सत्कार करण्यात आला.

