टीम अँकर
नवी दिल्ली| सरकारतर्फे शेतकरी आंदोलकांना पत्र पाठवण्यात आले होते, त्याला उत्तर देत शेतकरी आंदोलकांनी चर्चेसाठी चार मुद्यांचा अजेंडा सरकारला दिला आहे. त्यावर २९ डिसेंबर रोजी बैठक घेऊन सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे आज सांगण्यात आले. त्यामुळे सर्व देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
![]() |
| फोटो:फाईल |
सरकारने शेतकरी संघटनांना पत्र पाठवून सर्व मुद्यांवर आदरपूर्वक चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. शेतकरी संघटनांनी त्यावर एकमताने विचार करत सरकारला प्रतिसाद देत सरकारशी चर्चा तयारी दर्शवली असून संयुक्त किसान मोर्चाने चार कलमी अजेंडा दिला असून त्यावर २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे कळवले आहे. अशी माहिती आज संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सरकारने पत्रात सांगितलेल्या बाबींवर बैठकीत चर्चा करून सरकारला अजेंडा दिला असून त्यात पुढील मुद्यांचा समावेश आहे. १) तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक पद्धत असावी २) एमएसपीबाबत कायदेशीर हमी प्रक्रिया हवी ३) पराली दंडापासून शेतकऱ्यांची मुक्ती ४) वीज कायद्यातील मसुद्यात बदल हवा अशा प्रकारची मुद्दे शेतकरी आंदोलकांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद असल्याचे सांगितले आहे.
गेल्या ३१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा तिढा सुटतो की नाही हे आता दि. २९ डिसेंबरच्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल. तसेच आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही तर ३० रोजी शेतकरी सिंघू मार्गे टिकरी, शहाजहांपूर बोर्डरवर ट्रॅक्टर मोर्चा काढतील. त्यानंतर १ जानेवारी नवीन वर्ष शेतकऱ्यांसोबत साजरे करा असे आवाहन शेतकरी नेत्यांनी जनतेला केले आहे.
