- कांदा साठवण क्षमता आणि निर्यात खुली करा: खा.डॉ. पवार यांचे केंद्राला पत्र - TheAnchor

Breaking

December 22, 2020

कांदा साठवण क्षमता आणि निर्यात खुली करा: खा.डॉ. पवार यांचे केंद्राला पत्र

नाशिक| कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे पत्रव्यवहार  करत खा.डॉ.भारती पवार यांनी केली आहे.
Open-onion-storage-capacity-and-export-Dr-Pawars-letter-to-the-Center
फोटो:फाईल

महाराष्ट्र राज्य हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते तसेच देशाच्या ऐकून कांदा उत्पादनापैकी जवळपास 33 टक्के कांदा हा महाराष्ट्रात उत्पादित होतो. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याला परदेशात मागणी असल्याने त्याला चांगला भाव मिळून तो निर्यात होतो. सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Open-onion-storage-capacity-and-export-Dr-Pawars-letter-to-the-Center

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी खुली करावी व कांदा साठवणूक मर्यादेची अट शिथिल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल व केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिह तोमर यांना पत्रव्यवहार  करत खा.डॉ.भारती पवार यांनी मागणी केली आहे.