चांदवड| श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर व श्री साईकृपा रिसर्च फाऊंडेशन, नाशिक आणि चांदवड भोयेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिप प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मधुमेह आणि हृदयरोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १०० रुग्णांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत सकाळी १० ते दु . ३ वा. दरम्यान तपासणी शिबीर झाले. यावेळी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांना शिबीरात डॉ. किरण पांडव एमडी(अतिदक्षता तज्ञ) यांनी रुग्णांच्या तपासण्या करुन मार्गदर्शन केलं, तज्ञ डॉक्टरांमार्फत ब्लडप्रेशर, रक्तातील साखर, गरज भासल्यास ई.सी.जी. करण्यात आले.



