राळेगणसिद्धी| केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दि. ३० रोजी राळेगणसिद्धी येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांच्यासह अण्णांची राळेगणसद्धीमध्ये भेट घेत यशस्वी शिष्टाई करून अण्णांचे मन वळविण्यात आले. त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केल्याचे फडणवीस यांनी सांगितले
लोकशाहीत चर्चेतूनच मार्ग निघत असतात आणि अण्णा हजारे यांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. अण्णांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री, नीती आयोग सदस्य आणि मा. अण्णा हजारे यांचे प्रतिनिधी अशी एक उच्चस्तरिय समिती गठीत करण्यात येत आहे.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उच्चस्तरिय समितीचे गठन होते आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी केलेल्या मागण्या आणि त्या पूर्ण केल्यासंबंधीचा अहवाल सुद्धा यावेळी त्यांना सादर केला. मा. अण्णा हजारे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.
