नाशिक| राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेल आयोजित "वाण आरोग्याचं" या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक तालुक्यातील विल्होळी गाव येथे झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे होत्या.
या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाचिटणीस प्रो.सुवर्णा भिकचंद दोंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले. नाशिक तालुक्यातील विल्होळी गटात कार्यक्रम घेण्यात होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टरसेलचे डॉ.सागर तांबोळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ज्योती म्हस्के यांचे प्रमुख मार्गदर्शन महिलांना लाभले.तसेच डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ.ज्योती म्हस्के यांनी महिलांना स्तन व गर्भपिशवी कॅन्सर बद्दल मार्गदर्शन केले तसेच महिलांचे हिमोग्लोबीन, शुगर व कॅन्सरच्या प्राथमिक टेस्ट केल्या.



