Skip to main content

विभागीय केंद्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे: ना.अमित देशमुख

औरंगाबाद| नव्या जगाची गरज ओळखुन आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.अमित देशमुख यांनी केले. 
Research-and-training-should-be-done-in-the-divisional-center-minister-Amit-Deshmukh
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास, ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन आणि विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण या समारंभात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी  मा.ना. श्री. अमित देशमुख यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ नितीन करमळकर,  माजी कुलगुरू    डॉ दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. अजित पाठक, श्री. एन.व्ही.कळसकर, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.
या समारंभात अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे विविध ठिकाणच्या विभागीय केंद्रामध्ये समुपदेशन केंद्र उभारण्यात यावेत जेणेकरुन त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होउ शकेल. विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांचा क्लब स्थापन करण्यात यावा यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना उपयोग होउ शकेल. वैद्यकीय महाविद्यालयांचे व रुग्णालयांचे ऑडिट करण्यात यावे यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचायांचे, महाविद्यालयातील सुविधांचे ऑडिट व्हावे यामुळे त्यांच्या दर्जामध्ये अधिक सुधारणा होउ शकेल असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे वैद्यकीय महाविद्यालयामधील रॅंगिंग कृतीबंधात्मक दिशादर्शक पुस्तिका प्रकाशित करयात आली.  राज्यातील केवळ वैद्यकीय महाविद्यालयांनाच नव्हे तर सर्व महाविद्यालयांना उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने गेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाचे नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी मान्यता दिलेली आहे, लवकरच आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेरेपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु होती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कारार्थींचे आजवरचे कार्य हे दिशादर्शक आणि प्रेरणा देणारे आहे असे त्यांनी अभिनंदन करतांना सांगितले.
विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळर यांनी आरोग्य विद्यापीठाचे उपक्रम हे आरोग्य शाखांच्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यार्थी केंद्रबिंदु मानुन विद्यापीठाने नेहमीच वाटचाल केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये रॅंगिंगमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने विविध संलग्नित महाविद्यालयांना भेटी घेउन ध्येय: शुन्य टक्के रॅगिंग हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठाच्या विभागीय केद्राव्दारे केल्या जाण्याया कार्याची व्याप्ती व  भूमिका स्पष्ट करुन सांगितली. याच बरोबर विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ध्येयः शून्य टक्के रॅगिंग या पुस्तिकेचे प्रकाशन विद्यापीठाचे    मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. याच बरोबर आरोग्य शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ताींना विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर्शी वैद्यकीय विद्याशाखेतील जीवनगौरव पुरस्कार डॉ. अरुण महाले, डॉ. इंदुप्रकाश गजभिये,  डॉ. शरद कोकाटे यांना तर दंत विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. रमेश गांगल यांना तसेच होमिओपॅथी विद्याशाखेतील पुरस्कार डॉ. अरुण भस्मे यांना प्रदान करण्यात आले.

या समारंभाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले तर मा. उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास विविध क्षेत्रातील व्यक्ती, मा. प्राधिकरण सदस्य, मान्यवर व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या समारंभात कोविड-19 करीता शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...