Skip to main content

कोरोना निर्बंधांतून वाहतूक व्यवसायाला सूट द्या: ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या वेळेच्या निर्बंधांतून वाहतूक व्यवसायाला सूट देण्यात यावी अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडेय,मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे.
Exemption-of-transport-business-from-corona-restrictions-Transport-Associations-demand-to-CM
फोटो:फाईल
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात वाहतूक विभागाने दिवसरात्र सेवा देण्याचे काम केले आहे. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक निर्बंध घालण्यात आले असून वेळेची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. या मर्यादेचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या मर्यादा घातल्या जात असताना ट्रान्सपोर्ट व्यवसायाला काही वेळेच्या सवलती देखील देणे तितकेच महत्वाचे आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा पूर्णपणे उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे जसे उद्योग व्यवसाय चालतील त्याप्रमाणे वाहतुकदारांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे उद्योगांना दिलेली वेळेची सवलत ही ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना देखील देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, नाशिक शहरात मुख्यत्वेकरून जास्तीत जास्त ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांचे कार्यालय हे द्वारका व आडगाव आणि पाथर्डी फाटा परिसरात आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोडिंग आणि अनलोडिंगची कामे केली जातात.दि.२७ मार्च रोजी याच परिसरात रात्री ८ वाजता गाडीमध्ये माल लोडिंग करत असतांना भद्रकाली पोलीस स्थानकातील पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता समज दिली आहे. त्यामुळे सर्व वाहतूकदार चिंतेत आहे. वाहतुकदारांना कंपनीतून ज्या वेळेस माल उपलब्ध होईल त्यावेळेस लोडिंग आणि अनलोडिंग चे कामे होतात. त्यात जर पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांवर कारवाई केली तर वाहतूकदारांना सेवा देणे कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने आपल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांना वेळेत विशेष सवलत देण्याची गरज असल्याचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...