- एनसीपी प्रमुख खा.शरद पवार यांच्यावर ब्रीजकँडीत बुधवारी शस्त्रक्रिया - TheAnchor

Breaking

March 29, 2021

एनसीपी प्रमुख खा.शरद पवार यांच्यावर ब्रीजकँडीत बुधवारी शस्त्रक्रिया

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार त्यांच्या पोटात दुखत असल्याने आणि थोडेसे अस्वस्थता जाणवल्याने आज त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. निदान झाल्यावर त्यांना त्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी दि. ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली आहे.
NCP-chief-mp-Sharad-Pawar-underwent-surgery-at-brijacandy-on-Wednesday
फोटो:फाईल
ब्रीज कँडी मध्ये काही तपासण्या केल्यावर समजले की त्याच्या पित्त मूत्राशयमध्ये एक समस्या आहे. त्यांना देण्यात येणारी औषधे थांबवली आहे, तसेच पुढील उपचारासाठी त्यांना 31 मार्च 2021 रोजी पुन्हा ब्रीज कँडी रुग्णालयात पुन्हा दाखल केले जाईल, एन्डोस्कोपी झाल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत त्याचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे, असे मलिक यांनी सोशल मीडियात ट्विट करून माहिती दिली आहे.