संतोष गिरी
निफाड|निफाड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी देवगाव गणाच्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सदस्या गयाबाई सुपनर यांची बिनविरोध निवड आज निफाड पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली या निवडीप्रसंगी 18 पैकी 12 सदस्य उपस्थित होते.
विद्यमान उपसभापतो संजय शेवाळे यांनी राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर गयाबाई सुपनर यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शरद घोरपडे हे होते या बैठकीला पंचायत समितीच्या सभापती रत्नाताई संगमनेरे, गयाबाई सुपनर, राजेश पाटील, सपना बागुल, पंडित अहेर ,शिवा सुरासे, संजय शेवाळे, सोमनाथ पांनगव्हाणे, सुलभा पवार, सोनाली चारोस्कर, कमल राजोळे, दिलीप सूर्यवंशी आदी १२ सदस्य उपस्थित होते.
उपसभापतीपदी पदासाठी गयाबाई सुपनर यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून शिवाजी सुरासे यांचे नाव होते गयाबाई सुपनर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने उपसभापतीपदी गयाबाई सुपनर यांची बिनवोरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद घोरपडे यांनी जाहीर केले निवडीनंतर उपसभापती गयाबाई सुपनर यांचा सत्कार कानळद चे सरपंच शिवाजी सुपनर , निफाड अर्बन बँकेचे संचालक शिवाजीराजे ढेपले , माजी जिल्हा परिषद सदस्य हरिचंद्र भवर यांच्या वतीने करण्यात आलासदर निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण देवगाव गणातील असंख्य कार्यकर्त्यांनी केली