Skip to main content

सध्याचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णकाळ: डॉ. वरदराज बापट

नाशिक|प्रतिनिधी| पश्चिमात्य देशात साठ ते सत्तर टक्के अर्थव्यवस्था ही मोठ्या उद्योगांवर अवलांबून असते. भारतात मात्र परिस्थिती वेगळी असून येथे साठ ते सत्तर टक्के लघुद्योग आहेत त्याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने नवउद्योजकांना   सध्या  मोठी संधी आहे. कोरोनाचे संकट असले तरी सध्याचा काळ नवउद्योजकासाठी सुर्वणकाळ असल्याचे मत वरदराज बापट यांनी  व्यक्त केले. 
Response-to-Online-Seminar-on-Indian-Economy-by-Munje-Institute
"भारतीय अर्थव्यवस्थे वरील परिसंवाद - २०१६, २०२०, २०२४ आणि पुढील वाटचाल"  या विषयावर  शनिवारी  रोजी  आयोजित परिसवांदात डॉ  बापट बोलत होते.  या मध्ये  डॉ . आशुतोष रारावीकर (संचालक भारतीय रिजर्व बँक, अर्थतज्ज्ञ, डॉ. वरदराज बापट (इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि मुंबई, अर्थतज्ज्ञ), दिलीप शिनॉय  (सरचिटणीस एफ आय सी सी आय),  सचिन कुमार ( कार्यकारी संचालक टी एम एम ए), पद्मश्री  मिलिंद कांबळे ( संस्थापक अध्यक्ष डी आय सी सी आय ) आदी सहभागी झाले होते . विद्यार्थ्यांना कोर्पोरेट जगातील व्यवस्थापनाचा अनुभव या हेतूने विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

संचालिका डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी वक्त्यांचे स्वागत आणि प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आशुतोष रारावीकर यांनी करीत  विद्यार्थ्यांना  अर्थशास्त्र बद्दल  माहिती दिली. 
डॉ. रारावीकर म्हणाले कि मानवी जीवनात सर्वार्थाने अर्थ भरणाऱ्या अर्थशास्त्राने जीवन सुंदर होते इकॉनॉमिक्स ऑफ ब्युटीफुल लाईफ - लिटररी पर्स्पेक्टिव्हस या विचार  मांडताना सध्या च्या कसोटीच्या कालखंडात  अर्थशास्त्र हे  मानवी जीवनात मार्गदर्शक आहे. अर्थशास्त्रातल्या अनेक तांत्रिक संकल्पनांचा  अर्थ सांगून मानवी   जीवनातील  उपयुक्तता त्यांनी उलगडली. गेल्या दोन दशकांमधील नोबेल पारितोषिक विजेत्यांसह अनेक आर्थिक संशोधनाचा संदर्भ देत मानवी प्रगत कल्पना माणसाच्या दैनंदिन जीवनात कशा आमलात येतात हे  त्यांनी सांगितले. अर्थशास्त्र हे जीवन असुन मानवी जीवनात ही अर्थशास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्रावचा उपयोग मानवी कल्याणासाठी व्हावा असे ते म्हणाले.

डॉ. वरदराज बापट यांनी  जी एस टी कर प्रणाली मुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. संपूर्ण जग कोरोनाकडे वाटचाल करीत असताना मागिल अनेक वर्षात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय  अर्थव्यवस्था टिकून आहे. २००८ मध्ये जागतिक मंदी , सध्या २०२१ मध्ये कोरोना संकट असले तरी सन २०२४ मध्ये नक्कीच असेल. या  पूर्वी  सरकारी धोरणे हि मोठ्या उद्योगांना केंद्रित करणारी होती, मात्र मोदी सरकारने देशातील ७०% लघु उद्योगांना डोळ्या समोर ठेवल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. उद्योगांसाठी रेड कार्पेट नसले तरी देशातील उदयोन्मुख  नवउद्योजकांसाठी हि सुर्वण संधी आहे असे डॉ. बापट  यांनी सांगितले. 

दिलीप  शिनॉय यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना सवलती दिल्या. उद्योजकांसाठी जे आत्मनिर्भर पॅकेज केंद्र सरकारने दिले त्याचा  फायदा भविष्यात अर्थव्यवस्थे साठी निश्चित होईल. देशांतर्गत होणारी वेगवान वाहतूक, वीजनिर्मिती यामुळे उद्योगांना कमी खर्चात जास्त उत्पादन करणे शक्य आहे. सद्य स्थितीत शेती तसेच आयुर्वेदिक क्षेत्रासाठी हि मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. कोविडआधी  पी पी ई किट, एन ९५ मास्क भारताला माहित  नव्हते, मात्र आज भारत जगाला त्याचा पुरवठा करत आहे. चीन ने जगाला कोरोना दिला मात्र भारत जगाला कोरोना मुक्ती ची लस देत आहे.  

मिलिंद कांबळे यांनी जी एस टी करप्रणालीचा बदल हा ऐतेहासिक आहे. दोन कोटी एम एस एम ई यामध्ये सहभागी झाले असून छोटे उद्योगही टप्प्या टप्प्या ने यामध्ये येतील. अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासाठी देशांतर्गत स्पर्धा होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी  नव उद्योजक परदेशात जायचे ते आता देशातच काय नवीन करता  येईल   याचा विचार  करतात . यातच आत्मनिर्भर भारत चे यश दिसून येते. 

सचिन अरोरा यांनी थेट परकीय  गुंतवणुकी मुळे स्थानिक  उद्योगांना फटका बसला आहे. वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असला तरी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे  लागत आहे. त्यामध्ये सरकारी सबसिडी एक ते दोन वर्ष नाही. मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये अपुरे  मनुष्यबळ मोठे आव्हान उद्योजकांना पुढे असून जेथे ३० कर्मचाऱ्यांची गरज आहे  ७व्यक्ती काम करता अश्या गोष्टींचा फटका उद्योगांना बसतो. सरकार अनेक योजना  करत असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे कांबळे यांनी सांगितले. 

इन्स्टिटयूटचे  अध्यक्ष राहुल वैद्य, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. शीतल गुजराथी  यांनी  मार्गदर्शन केले.विद्यार्थी आयोजन समितीचे युवराज पवळे, परेश वाकचौरे, अद्वैत पाटील,सौरभ कारे, राज केदारे, सुजित विश्वकर्मा, प्रथमेश पिंगळे, निलेश वाडिले, विवेक धोंडगे, विवेक पाटील, पल्लवी राखेचा, एकता ढगे, शुभदा वीर, नेहा क्षिरसागर, अंजली यादव, धनश्री माळी या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...