Skip to main content

समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून माणूसकीचे दर्शन; कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबास १ लाखांची मदत

नाशिक| कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र साळुंखे (वय 47) यांचे 5 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरूष अचानक सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहत समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार तर दिला ; परंतु 1 लाखांचा निधी तात्काळ जमा करून कुटूंबाच्या स्वाधीन केला. 
A-vision-of-humanity-from-social-welfare-workers-1-lakh-assistance-to-the-family-of-an-employee-who-died-due-to-corona
जितेंद्र साळुंखे यांचं संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह होते. आई, पत्नी , मुलगा व स्वत:जितेंद्र साळुंखे यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. या उपचारात त्यांची आई बरी होऊन घरीच विलीगीकरणात राहत  होती.  उपचार सुरू असतांना जितेंद्र यांचा मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या आईचा मृत्यु झाला. मुलगा व पत्नीं यांचे उपचार चालू असल्यामुळै त्यांना जितेंद्र यांच्या मृत्युची कल्पना देण्यात आली नाही.  मुलगा व पत्नी उपचारातून बरे झाल्यावर त्यांना घडलेली हकीकत सांगण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.  यावेळी समाज कल्याण कर्मचारी या कुटूंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहीले. त्यांना मानसिक आधार दिला. 

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र देवरे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष के.डी.चव्हाण यांनी पुढाकार घेत राज्यातील सर्व समाजकल्याण कर्मचाऱ्यांना निधी जमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला समाज कल्याण कर्मचाऱ्यांबरोबर काही अधिकाऱ्यांनी ही चांगला प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली. यात राकेश महाजन, राकेश पाटील, श्रीमती अमिना शेख, डॉ.माधव कुसेकर या अधिकाऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केली. 

महाराष्ट्र शासनाकडून फ्रंट लाईन वर राहून काम करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्याच्या  मृत्युनंतर कुटूंबाला 50 लाखांची मदत केली जाते. या यादीत समाज कल्याण विभाग येत नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना ही शासकीय मदत मिळत नाही. मात्र समाज कल्याण विभागाच्या अनेक शासकीय वसतिगृहात कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत.  याठिकाणी समाज कल्याण विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात यावी. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. असे समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी सांगितले. 

जितेंद्र साळुंखे यांच्या कुटूंबाला 1 लाख रूपयांची रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाच्या अनुकंपा नोकरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या कृतीमुळे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. समाजापुढे एक आदर्श ऊभा केला आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...