Skip to main content

रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन तातडीने उपलब्धता करा: खा.डॉ.भारती पवार

नाशिक| जिल्हयात कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना लवकरात लवकर रेमडीसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्न, औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
Immediate-availability-of-injections-and-oxygen-at-Remedic-Dr-Bharti-Pawar

महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असताना नाशिकमध्ये कोविड-19 या आजाराने बाधित सर्वाधिक रूग्ण आहे. नाशिक जिल्ह्यातील गावागावात कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन बाधित रूग्णांची प्रकृती अपुऱ्या उपाययोजनांच्या अभावामुळे चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना अतिशय गरजेच्या असणाऱ्या रेमडीसिवर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या(O2) कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या गंभिर परिस्थितीत बाधित रूग्णांना उचित उपचार मिळावा याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी तातडीने रेमडीसिवर इंजेक्शन व ओक्सिजांचा(O2) मुबलकसाठा उपलब्ध व्हावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचेकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.





राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून जिल्ह्यातील तालुका ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करा खा.डॉ.भारती पवार

जिल्हाभरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत देखील लाक्षणिय वाढत होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेवुन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(SDRF) मधून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करणेकामी योग्य ते नियोजन करण्याच्या खा.डॉ.भारती पवार यांनी सूचना केल्या.


जिल्हा ग्रामिण रूग्णालय नाशिक येथे ग्रामिण भागातील रूग्णांसाठी अतिरिक्त ऑक्सिजन बेडची व्यवस्था करा – खा.डॉ.भारती पवार

नाशिक जिल्ह्यातील ग्रामिण भागात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्हा ग्रामिण रूग्णालयातील रूग्णांसाठी असलेले बेड अपुरे पडत आहेत. ग्रामिण भागातुन शहरात येणाऱ्या रूग्णांचा आकडा वाढत असल्याने त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थीत जिल्हा ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजन बेडची अधिक वाढ करून तातडीने व्यवस्था करावी व त्याचे योग्य ते नियोजन करण्यात यावे जेणेकरून ग्रामिण भागातुन येणाऱ्या रूग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल व त्यांना वेळेवर योग्य तो उपचार देखील मिळण्यास मदत होईल याकरिता दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन सूचना केल्या आहेत.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...