नाशिक| कोरोना संकटाचे थैमान सुरू असतांना कोव्हीड रुग्णांची वाढलेली अमर्याद संख्या यामुळे नाशिक जिल्हयात परिस्थिती गंभीर आहे. आहे. रुग्णांच्या नातेवाईकांंकडून रोज खा. डॉ भारती पवार यांच्याकडं मदतीची मागणी केेली जात आहेे. त्यात रेमडीसिवर औषध उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाल्याचे दृश्य होते. अखेर खा. पवार यांनी तत्काळ हालचाली करून रेमडीसीवरची एक हजार औषधे उपलब्ध करून दिले.
अतिशय मन हेलवणारे संभाषण 'रुग्णांची गंभीर अवस्था त्यातच त्यांना वेळेवर न मिळणारा बेड ,त्यांना लागणारा ऑक्सीजनचा तुटवडा तसेच रेमडीसीवर हे लागणारे इंजेक्शन आणि अशी परिस्थिती असतांना ही रेमडीसीवर इंजेक्शन कशी उपलब्ध होतील विवंचनेत असतांना रेमडीसीवर उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्यांशी खा .डॉ भारती पवारांनी संभाषण करत हे इंजेक्शन नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी कसे उपलब्ध करता येईल
याकडे लक्ष केंद्रित केले .त्याच बरोबर केंद्राच्या आरोग्य विभागाकडे ही सातत्याने याचा पाठपुरावा करत होत्या. गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगलोर येथील मायलान कंपनीचे श्री नरेशजी हसीजा यांनी खा. डॉ भारती पवार यांच्या विनंतीला मान देऊन एक हजार इंजेक्शन हे नाशिक जिल्ह्यातील कोव्हीड रूग्णालयांसाठी उपलब्ध करून दिले आहे व त्याची प्रक्रिया पूर्ण करत बंगलोर येथून हे इंजेक्शन नाशिक येथे दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यात मागणी केलेल्या कोविड रुग्णालयांना त्यांच्या पेशंटच्या संख्येनुसार हे रेमडीसीवर दिले जाणार असल्याचे खा. डॉ भारती पवार यांनी सांगितले आहे अश्या कठीण परिस्थितीत केंद्र सरकारची मदत व जिल्हाधिकारी तथा त्यांच्या टीमने योग्य नियोजन केले.
तसेच रेमडीसीवर लवकरात लवकर नाशिकला उपलब्ध होण्यासाठीअन्न औषध प्रशासनाचे सह संचालक भामरे साहेब यांच्याशी हा गंभीर विषय अवगत करून रेमडीसीवर इंजेक्शन कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध व्हावे म्हणून केलेली चर्चा आणि याचाच परिणाम म्हणून हे एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन खा डॉ भारती पवार यांनी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून जिल्हाधिकारी श्री मांढरे साहेब यांचेकडे सुपूर्द केले व मायलॉन कंपनीचे नरेशजी हसिजा यांचे विशेष आभार मानले.
