म्युकरमायकोसिस हा आजार म्युकरमायसेट्स या फंगसामुळे होतो, हा आजार खूप दुर्मिळ आहे, परंतु तेवढाच गंभीर स्वरूपाचा आहे याला जर वेळीच ओळखलं नाही आणि औषध उपचार केला नाही तर जीवघेणा ठरू शकतो.
हा आजार होण्याचे कोणते कारणे आहेत. याचे मुख्य कारण म्युकरमायसेट्स या फंगी किंवा बुरशीमुळे होतो, हा आजार कोणाला होऊ शकतो, जे कोणी डायबिटीज , एच. आय.व्ही.किंवा कॅन्सरने बरेच दिवस आजारी असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तेंव्हा त्यांची रोग प्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात कमी होऊ शकतो तेंव्हा हा फंगस नाकाद्वारे किंवा तोंडाद्वारे किंवा त्वचा वरील जखमा द्वारे शरीरात प्रवेश करून हा आजार होऊ शकतो.
आधी हा फार कमी लोकांना आजार होत होता. आपण कधी याचे नाव हि ऐकले नव्हतो. फार दुर्मिळ असा हा आजार होता. परंतु आता कोरोनामुळे आणि त्याच्यावरील वापरण्यात येण्या-या अनेक प्रकारच्या औषधांमुळे मुख्यतः स्टेरॉईडमुळे काहींची रोगप्रतिकारशक्ती फारच कमी आहे. त्यांना हा आजार होऊ शकतो परंतु कोरोना झालेल्या सर्वांनाच हा आजार होत नाही. ज्यांचे रोग प्रतिकार शक्ती फार म्हणजे फारच कमी झाला असेल तरच हा आजार होऊ शकतो. जर आपण काही काळजी घेतल्यास हा आजार होण्याचे प्रमाण अजून कमी होऊ शकतो . हा फंगी सर्वांच्याच संपर्कात येत असतो, कारण हा फंगी वातावरणात जमिनी वर दमट वातावरणात आढळतो , परंतु आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे आपल्याला हा आजार होत नाही याचे प्रमाण फार कमी आहे परंतु ज्यांचे रोगप्रतिकार शक्ती खूप कमी झाले असेल किंवा मधुमेह चा त्रास खूप जुना असेल आणि कोरोना मध्ये बरेच दिवस ऍडमिट झाला असाल तर थोडीसी काळजी घ्यायला पाहिजे खाली दिलेल्या मधील लक्षणे जर आढळ्यास लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा .
कोणती लक्षणे आढळतात
म्युकरमायकोसिस चे काही प्रकार आहेत सध्या ‘ऱ्हायनोसेरेब्रल’ [ Rhinocerebral ] हा सर्वात जास्त लोकांमध्ये आढळत आहे .याच्यात हा फंगी नाकाद्वारे प्रवेश करून मेंदू पर्यंत पोचतो तेंव्हा हा रोग गंभीर होतो. सुरुवातीला काही लक्षणे दिसायला लागतात ते बघून लगेच डोक्टरांना भेटावे. ताप येणे, डोके दुखणे, चेह-याच्या एका बाजूला सूज येणे एक डोळा सुजणे, नाकाच्य त्वचेवरील रंग बदलणे काळे ठिपके पडणे.
दुसया प्रकारे मध्ये हा फंगी तोंडाद्वारे आतड्यांमध्ये पोचतो आणि छोट्या आतड्यामध्ये प्रहार करतो त्यामुळे उलटी मध्ये रक्त येणे किंवा मल् मध्ये रक्त येणे
पोट भरल्या भरल्या सारखे वाटणे हे लक्षणे आहेत
तिसऱ्या प्रकार मध्ये हा फंगी नाका द्वारे प्रवेश करून फुफ्फुसा मध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दुसऱ्या प्रकारा मध्ये त्वचामधून हा फ़ंगी शरीरात प्रवेश करतो. अजून एका प्रकारे मध्ये हा रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरतो.
निदान करण्याचे प्रकार कोणते आहेत
यांच्यात रक्ताच्या तपासण्या केले जातात, आजार असलेल्या भागाचे जसे फुफ्फुसाचे, डोक्याचे, पोटाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. ‘म्युकॉरमायकोसिस’मुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रवाची तपासणी केली जाते आणि निदान पक्कं केलं जातं.
उपचार
ऍलोपॅथिक मध्ये इंजेकशन दिले जातात , अँटीफंगल गोळ्या वापरले जातात . हे सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानें घेतले पाहिजे. होमिओपॅथिक मध्ये प्रत्येकाचे लक्षणे बघून औषधे घेतले पाहिजे याच्यात phoshorus , Thuja , Arsenicum Album ,आणि इतर बरेच औषधे येतात ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले पाहिजे .या आजाराबाबत काही माहिती लागल्यास 7208200618 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ही संपर्क साधता येईल.
डॉ. संजय सनादे
