नाशिक| कोरोना काळात कोणीही धान्यापासून वंचीत राहाणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून सेनेटायझर, दोन कार्डधारक यांच्यातील सुरक्षित अंतर ठेवणे आणि मास्कचा वापर करणे बंदनकारक करावे अशा सूचना पुरवठा उपायुक्त डॉ. स्वाती देशमुख पाटील यांनी केल्या. त्यांनी आज विविध रेशन दुकानांना तपासण्या केल्या.
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रास्त भाव दुकानदार गणपत डोळसे पाटील यांच्या दुकानाची ही तपासणी करून माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. तसेच विविध सूचना त्यांनी केल्या. यावेळी दुकानदारांनी आपल्या अडचणी मांडल्या, मशीनला नेटवर्क नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली तसेच सर्व्हरला प्राबलेम येत असून मशीनमध्ये माल अंत्योदय व प्राधान्य हा वेगवेगळा (स्वतंत्र) टाकावा अशी मागणी केली म्हणजे स्टॉक काडायला अडचण येणार नाही. स्टॉक वेगवेगळा नसल्यामुळे समजत नाही अशी अडचण ही सांगितली.
यावेळी पुरवठा उपायुक्त डॉ. स्वाती देशमुख पाटील यांच्यासह तहसिलदार सोनवणे, राज्य ग्राहक परिषद मुंबई सदस्य योगेश बत्तासे, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य तथा रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, पुरवठा निरिक्षक भागवत ढोणे, तलाठी तात्या दिगंबर राऊत, सरपंच भाऊसाहेब गांगुर्डे, पोलीस पाटील निलेश बोडके, लक्ष्मण गायकवाड, अनिल धात्रक, मदन आव्हाड आदी उपस्थित होते.

